बावडा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा बंद
बावडा बंद

बावडा बंद

sakal_logo
By

बावड्यात बंदला शंभर टक्के प्रतिसाद

कोल्हापूर, ता. ७ ः मोबाईलवरील आक्षेपार्ह स्टेटसच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला कसबा बावडा आणि परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासून दबकत दबकत व्यवहार बंद-सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शहरात या बंदला हिंसक वळण लागल्याची माहिती मिळताच संपूर्ण बावडा परिसरातील दुकाने दिवसभर बंद राहीली. शहरातील दंगलीमुळे या परिसरातही भितीचे वातावरण होते.
कसबा बावडा व परिसरात सकाळपासूनच मुख्य रस्त्यावरील काही दुकाने बंद होती. पण काही दुकानदारांनी बंदचा अंदाज घेत अर्धवट अवस्थेत दुकाने सुरू ठेवली होती. या परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख रस्त्यावरून फिरून बंदचे आवाहन केले. त्याचवेळी कोल्हापुरात या बंदला हिंसक वळण लागल्याची माहिती समाजमाध्यमांवरून पसरली. त्यामुळे या परिसरातील उघडलेली दुकाने पुन्हा बंद झाली. दिवसभर या परिसरात शुकशुकाट होता. सायंकाळनंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेत काही दुकाने सुरू झाली. पण काही दुकानदारांनी सायंकाळनंतरही आपले व्यवहार बंद ठेवले.