
सकाळ नाट्य महोत्सव
पडदा व लोगो- कालच्या टुडे एकवरून
..............
08068, 08063
............
सकाळ नाट्य महोत्सवाला हाउसफुल्ल गर्दी
डॉ. शरद भुताडिया यांचा होणार गौरवः ‘नियम व अटी लागू’ नाटकाने आज सांगता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः आशयसंपन्न आणि खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या नाटकांच्या सकाळ नाट्य महोत्सवाला कोल्हापूरकर रसिकांनी हाउसफुल्ल प्रतिसाद दिला आहे. आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहावर ‘हाउसफुल्ल’चा फलक लागला. उद्या (गुरुवारी) संकर्षण कऱ्हाडे लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने महोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी मराठी रंगभूमी व सिने क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांचा विशेष सन्मान होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, कविता लाड-मेढेकर यांच्यासह सहकलाकारांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग रंगला. अतुल तोडणकर, राजश्री चिटणीस, पूर्वा भिडे, राजसिंह देशमुख, पराग डांगे आदींच्या भूमिका होत्या. एका निखळ मनोरंजनाची सलग दुसऱ्या दिवशी या प्रयोगाच्या निमित्ताने रसिकांना पर्वणी मिळाली. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, चितळे डेअरीचे सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, तनिष्क ज्वेलर्सचे संचालक प्रसाद कामत, जय कामत, मोहन ऑटोचे सरव्यवस्थापक विशाल वडेर, शिव-समर्थ को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे शाखाधिकारी राजवर्धन निंबाळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत कलाकारांचे सत्कार झाले. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले.
चितळे डेअरी महोत्सवाचे मुख्य प्रायोजक, तर सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), माई ह्युंदाई, दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) हे आहेत. तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ९५६१६२६६६५ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. त्याशिवाय संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहावर सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत तिकिटे उपलब्ध आहेत. काही जागा राखीव आहेत. तळमजल्यासाठी प्रतिनाटक पाचशे व बाल्कनीसाठी प्रतिनाटक चारशे रुपये तिकीट आहे.
...
भाग्यवान रसिकांना बक्षिसे...
‘माई ह्युंदाई’च्या वतीने उपस्थित प्रेक्षकांमधून रोज तीन भाग्यवान रसिकांची निवड केली जात आहे. तिन्ही दिवसांतील विजेत्यांना ‘माई ह्युंदाई’कडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ९) ‘माई ह्युंदाई’च्या शोरूममध्ये होणार आहे.