आजऱ्यात मनसेचा आंदोलनचा इशारा

आजऱ्यात मनसेचा आंदोलनचा इशारा

आजऱ्यात मनसेचा आंदोलनचा इशारा
आजरा, ता. ७ : आजरा बसस्थानकातील स्वच्छतागृहातील अस्वच्छता यासह विविध गोष्टीबाबत शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी गेले असता ठेकेदार व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. याबाबत कारवाई करावी, अन्यथा मनसेचे पदाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने आजरा आगारप्रमुखांना दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे, आजरा बसस्थानक व तेथील स्वच्छतागृहातील अस्वच्छता यासह विविध गोष्टीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रारी आल्या आहेत. महिला व पुरुषांच्या स्वच्छतागृहात स्वच्छता नाही. अपंगासाठी राखीव असलेल्या स्वच्छतागृहाला टाळा लावला आहे. यासह अनेक गोष्टीं निदर्शनास आल्यावर मनसेचे पदाधिकारी शहानिशा करण्यासाठी बसस्थानकात गेले. त्यांच्याबरोबर ठेकेदार व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी असभ्य व उर्मट वर्तन केले. त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अन्य़था जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुफल व तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करतील. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, जिल्हा अध्यक्ष जनहीत व विधीकक्ष परशुराम बामणे, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, सचिव चंद्रकांत सांबरेकर, महिला तालुका अध्यक्षा सरीता सावंत, उपाध्यक्षा वैष्णवी दळवी, तेजस्वीनी देसाई, अश्‍विन राणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com