ग्रेस गुण मिळवण्यात कोल्हापूर टॉप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रेस गुण मिळवण्यात कोल्हापूर टॉप
ग्रेस गुण मिळवण्यात कोल्हापूर टॉप

ग्रेस गुण मिळवण्यात कोल्हापूर टॉप

sakal_logo
By

विविध खेळांचा लोगो वापरावा

ग्रेस गुण मिळविण्यात कोल्हापूर जिल्हा टॉप...

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेत ग्रेस गुण मिळविणाऱ्या खेळाडूंचा आकडा २४२२ इतका राहिला. दहावीतील १४४२, तर बारावीतील ९८० खेळाडूंचा त्यात समावेश असून, ग्रेस (सवलत) गुण मिळविण्यात कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर विभागात टॉप ठरला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाने वेळेत खेळाडूंच्या स्पर्धांतील कामगिरीचा आढावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवल्याने दिलेल्या प्रस्तावांपैकी एकाही प्रस्तावावर मंडळाला हरकत घेता आली नाही.
शाळा व महाविद्यालयांत शिकणाऱ्या खेळाडूंना खेळ व अभ्यासाचा ताळमेळ साधता येणे अशक्य असते. सरावात खंड पडल्यास त्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. दहावी व बारावीतील खेळाडूंनी अभ्यास करणे आवश्‍यक असताना, ते मैदानावर पदके मिळविण्यासाठी कष्ट करतात. त्यातून कसाबसा वेळ काढून ते अभ्यास करतात. त्यांनी अनुत्तीर्ण होऊ नये, यासाठी मंडळातर्फे त्यांना ग्रेस गुण दिले जातात. ज्या विषयांत त्यांना कमी गुण पडले आहेत, त्यात ग्रेस गुणांची भर घातली जाते.
जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे खेळाडूंचे प्रस्ताव मंडळाकडे दिलेल्या मुदतीत पाठविले. दोन वर्षांपूर्वी ग्रेस गुणांमुळे क्रीडा कार्यालय व मंडळ आमने-सामने आले होते. खेळाडूंचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका क्रीडा कार्यालय घेत आले आहे. यंदाही क्रीडा कार्यालयाने क्रीडा शिक्षक, खेळाडूंना आवाहन करून प्रस्ताव मंडळाकडे पाठवले. त्याचा परिणाम म्हणून विविध स्तरावर पदक विजेत्यांना खेळाडूंना ग्रेस गुण मिळाले.

चार्ट करणे
असे मिळतात ग्रेस गुण :
जिल्हास्तर - ५
विभाग - १०
राज्य - १५
राष्ट्रीय - २०
आंतरराष्ट्रीय - २५
--------------
चौकट
२०२२-२३ मध्ये १० परीक्षेत ग्रेस मिळविणारे खेळाडू
* प्रस्ताव * शालेय स्पर्धा * संघटना स्पर्धा
- जिल्हास्तर - ९६६ - ८
- विभागीय - २०२ - ०
- राज्यस्तर - १८२ - ६४
- राष्ट्रीय - १५ - ५
--------------
चौकट
२०२२-२३मध्ये १२ परीक्षेत ग्रेस गुण मिळविणारे खेळाडू :
* प्रस्ताव * शालेय स्पर्धा * संघटना स्पर्धा
- जिल्हास्तर - ४६० - ०
- विभागीय - २०० - ०
- राज्यस्तर - २८९ - १६
- राष्ट्रीय - ० - १४
- आंतरराष्ट्रीय - ० - १