भाजप तयारी

भाजप तयारी

कोल्हापूरची जबाबदारी खासदार महाडिकांवर
भाजपची निवडणूक तयारी ः विधानसभा मतदारसंघ संभाव्य उमदेवारांकडेच

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः एक वर्षावर आलेल्या लोकसभा आणि दीड वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती ठरली आहे. त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तर हातकणंगलेची जबाबदारी सत्यजित देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, याचवेळी विधानसभा मतदारसंघनिहायही प्रभारी व्यक्तींची नियुक्तीही आज पक्षाने केली असून, त्यात बहुंताशी संभाव्य उमेदवारांवरच त्या त्यात विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ही यादी आज जाहीर केली. त्यात सांगली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दीपक शिंदे यांच्यावर तर सातारची जबाबदारी अतुल भोसले यांच्याकडे दिली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक घरांपर्यंत पोहोचवण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मिळून १८० योजनांतून कोट्यावधी रुपयांचा निधी समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या योजनांतील लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे मेळावे, त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच योजनांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ का मिळत नाही आणि तो मिळवून देण्यासाठी काय करावे यासाठीचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित प्रभारीवर सोपवली आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीची शक्यता असल्याने येत्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे व विविध योजनांच्या प्रचार, प्रसारासाठी मतदारसंघातील मोठ्या गावांत मेळावे, लाभार्थ्यांच्या बैठका घेणे, लाभ न मिळालेले नवे लाभार्थी शोधून त्यांना योजनेचा फायदा मिळवून देणे यासारखी कामे संबंधितांना एक वर्षात करावी लागणार आहेत. विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्या त्या मतदारसंघातील प्रभारींनी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, बूथ कमिटी प्रमुख, शक्तिस्थळ प्रमुख यांच्याकडून घ्यायचा आहे तर लोकसभा निवडणुकीचा आढावा संबंधित प्रभारीकडून लोकसभेसाठी नेमलेल्या व्यक्तींनी घेण्याचा आहे असे याचे स्वरूप आहे.

चौकट
विधानसभानिहाय जबाबदारी अशी
कोल्हापूर दक्षिण-शौमिका महाडिक, कोल्हापूर उत्तर-सत्यजित ऊर्फ नाना कदम, कागल-समरजितसिंह घाटगे, करवीर-हंबीरराव पाटील, राधानगरी-भुदरगड- राहुल देसाई, शाहूवाडी- प्रवीण प्रभावळकर, हातकणंगले-अशोक माने, इचलकरंजी - अरविंद शर्मा, शिरोळ- राजवर्धन नाईक-निंबाळकर

कोट
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ही जबाबदारी संबंधितांवर सोपवली आहे. भाजप-शिंदे गट सध्या एकत्र आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटासोबत आहेत. प्रत्यक्ष जागा वाटप झाल्यानंतर शिंदे गटाला किती जागा दिल्या जातील व त्या जागेवर भाजपचे कार्यकर्ते मदत करतील. सध्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आणि भाजपचे कार्य लोकांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे हेच या नियोजनाचा प्रमुख हेतू आहे.
- धनंजय महाडिक, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com