संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दीसाठी
अंगणवाडी सेविका वेठीस
जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे आरोप
कोल्हापूर, ता. ८ : मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी सभेला गर्दी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून बसगाड्या सोडल्या जाणार असून त्या बस भरण्याची व घेऊन येण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे. याव्दारे अंगणवाडी सेविकांना वेठीस धरल्याचा प्रकार होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी पत्रकाव्दारे केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, अंगणवाडी लाभार्थी हे शुन्य ते ३ व तीन ते सहा वयोगटातील मुले आहेत. तसेच गरोदर माता व स्तनदा माता देखील लाभार्थी आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हे लाभार्थी येऊ शकतील का ?, याचा विचार केलेला नाही. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर जमा करण्यात सरकारला अपयश येते. अशावेळी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
---------
जोशी, गोंधळी, वासुदेव, बागडी
समाजाचे रविवारी चर्चासत्र
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा जोशी, गोंधळी, वासुदेव व बागडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. ११) चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तसेच या वेळी मोफत वधु वर परिचय मेळावाही होईल. टेंबलाईवाडी येथील पाटील मंगल कार्यालयात होणाऱ्या या चर्चासत्रात विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात येतील, अशी माहिती समाजसेवाचे शशिकांत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चर्चासत्रात चर्चिल्या जाणाऱ्या मागण्या अशा; भटक्या जमातीना जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पुर्वीचा महसुली पुराव्याची जाचक अट कायमची रद्द करावी. जोशी, गोंधळी, बागडी व वासुदेव या समाजासाठी असलेले आरक्षण वाढविण्यात यावे. केंद्र शासनाचा ओबीसी दाखल्याची एक वर्षाची वैधता कायमची रद्द करून राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाकडून कायमचा ओबीसी दाखला मिळावा. भटक्या जमातींसाठी गृहप्रकल्प राबविण्यासाठी महसुली पड जमिनीवर शासन स्तरावर योजना राबविण्यात यावी. या समाजासाठी वेगळ्या विकास महामंडळाची स्थापना व्हावी. भटक्या विमुक्तांची जातीनिहाय जनगनणा व्हावी, त्याचा वेगळा डाटा तयार करण्यात यावा. पत्रकार परिषदेला बबनराव दोरकर, गोपाळराव काटे, बाळासो काळे व संतोष सुर्यवंशी उपस्थित होते.