नालेसफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाई
नालेसफाई

नालेसफाई

sakal_logo
By

नाल्यांतून २१०७ टन गाळ उठाव
मान्सूनपूर्व तयारी; ९७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा
कोल्हापूर, ता. ८ : मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामातून आज अखेर २१०७ टन गाळ उठाव करण्यात आला आहे. यातील गाळ उठावसाठी डंपरच्या ४२७ खेपा करण्यात आल्या आहेत. शहरातील ९७ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. चार पोकलॅन, दोन जेसीबी, दोन डंपर भाडयाने घेतले होते.
शहरातील लहान मोठे असे अंदाजे २० किलोमीटर लांबीच्या २१ नाल्यांची स्वच्छता व गाळ उठाव या मशिनव्दारे करण्यात आला आहे. प्रभागातील चॅनेल सफाई करण्यासाठी जेसीबी मशिन व ४० कर्मचारी यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. चार पोकलॅन मशिनव्दारे जयंती पंपिंग स्टेशन ते सिध्दार्थनगर नाला, सुतारवाडा, लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल पाठीमागे ते हॉकी स्टेडियम नाला, हुतात्मा गार्डन ते वाय.पी.पोवार नगर, वर्षानगर, मनोरमानगर ते राजेंद्रनगर, शाम हौसिंग सोसायटी नाला ते देवकर पाणंद या ठिकाणी नाले सफाईचे काम पुर्ण झाले आहे. निकम पार्क ते साळोखेनगर नाला, हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर, मनोरा हॉटेल ते राजेंद्रनगर व लक्ष्मीपुरी येथे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांव्दारे ८० प्रभागांमध्ये ४६६ चॅनेल व जेसीबी मशिनव्दारे २०६ पैकी १९९ इतक्या चाचीतील गाळ काढला आहे. उर्वरित नालेसफाईचे काम ३ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
--------
चौकट
गाळ नाल्यातच; काही ठिकाणी काठावर..
काही ठिकाणी नाल्यातून काढलेला नाळ नाल्यातच ठेवला आहे. काही ठिकाणी काठावर ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो उठवलेला नाही. एखादा जरी पाऊस झाला तर तो गाळ पुन्हा नाल्यात व नंतर नदीत जाणार आहे. त्यासाठी कृती समितीच्यावतीने सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.