Tue, Sept 26, 2023

जन्ममूत्यू परिणाम
जन्ममूत्यू परिणाम
Published on : 8 June 2023, 5:27 am
जन्म-मृत्यू नोंदणीच्या प्रक्रियेत अडथळा
कोल्हापूर, ता. ८ ः इंटरनेटसेवा बंद असल्याने महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणीच्या प्रक्रियेत अडथळा आला. जन्म-मृत्यू नोंदणी ऑनलाईन झाली असल्याने नोंदी करण्यात अडचणी आल्या. तसेच महापालिकेतील इतर कामांनाही फटका बसला. महापालिकेकडील जुन्या नोंदीही ऑनलाईन घेतल्या जात आहेत. तसेच नवीन येणाऱ्या नोंदी थेट ऑनलाईन केल्या जात आहेत. त्यासाठी इंटरनेट आवश्यक होते. त्या नोंदीवर परिणाम झाला. दररोज किमान १०० हून अधिक नोंदणी होत असते. ज्यांना ऑनलाईन दाखले हवे होते, त्यांनाही मिळाले नाहीत.