Wed, October 4, 2023

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त
Published on : 9 June 2023, 12:07 pm
गवसेजवळ बर्निंग कारचा थरार
आजताः गवसे (ता. आजरा) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बर्निंग कारचा थरार अनुभवास आला. आगीमध्ये कार जळून खाक झाली. चालक इरफान मोहम्मद बारगीर (वय २५, रा. विजयनगर, कुपवाड रोड, ता. मिरज) यांनी याबाबतची वर्दी आजरा पोलिसांत दिली आहे. यामध्ये सुमारे १ लाख ४० हजारांचे नुकसान झाले आहे. बारगीर हे कारमधून कोकणातून सांगलीकडे चालले होते. या वेळी गाडीतून अचानक मोठा आवाज झाला व सगळीकडे धूर पसरला. आगीच्या ज्वाळांनी गाडी वेढली गेली. बारगीर यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली व ते गाडीतून बाहेर पडले. आगीत गाडी जळून खाक झाली आहे. पोलिस हवालदार दता शिंदे अधिक तपास करीत आहेत.