चंद्रकांत पाटील यांच्यावरील लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील यांच्यावरील लेख
चंद्रकांत पाटील यांच्यावरील लेख

चंद्रकांत पाटील यांच्यावरील लेख

sakal_logo
By

डोके नामदार चंद्रकांत पाटील वाढदिवस विशेष
----

सामाजिक जाणिवेचा राजकारणी
‘मी बिना पत्त्याचे पाकीट आहे. पक्षाने त्यावर पत्ता लिहिवा आणि पाकीट पाठवावे.’ राजकीय पद, उमेदवारी किंवा मंत्रीपदाबद्दल चंद्रकांत पाटील यांना प्रश्व विचारला की त्यांचे हे उत्तर ठरलेले असते. राजकीय महत्त्वकांक्षेसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या जातात असा हा काळ आहे. मात्र या काळात चंद्रकांत पाटील यांचे उत्तर निष्ठा, संयम आणि सामाजिक दृष्टिकोनातून वैचारीक बांधिलकीने केलेल्या राजकीय वाटचालीचे द्योतक ठरते.
-प्रतिनिधी

हा विचार आणि संस्कार आला कोठून? याचे मूळ त्यांच्या विद्यार्थी दशेतील काळात मिळते. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. मोठ्या कष्टाने त्यांनी मुलांना वाढवले. शाळेत असताना घरात छोटे मोठे काम करायचे आणि शैक्षणिक खर्च पूर्ण करायचा असे त्यांचे बालपणीचे जीवन होते. महाविद्यालयात गेल्यावर त्यांचा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. ज्ञान, शील आणि एकता या त्रिसूत्रीवर चालणारी ही संघटना युवा पिढीचे राष्ट्रीय चारित्र्य घडवते. मुळ स्वभावातच सामाजिक जाणीव असणाऱ्या दादांनी परिषदेचे संस्कार आत्मसात केलेच. पण, आपले आयुष्य हे समाजासाठीच खर्ची करायचे हा निश्चय त्यांनी केला. घरातील परिस्थितीकडे न पाहता शिक्षण पूर्ण झाल्यावर ते विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून १९८१ मध्ये घराबाहेर पडले. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या निश्चयाला पाठिंबा दिला. सुरुवातीला त्यांची नियुक्ती जळगावमध्ये झाली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशमंत्री, प्रदेश संघटनमंत्री महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचे क्षेत्रीय संघटनमंत्री आणि त्यानंतर अखिल भारतीय महामंत्री म्हणून त्यांनी विद्यार्थी परिषदेचे काम केले. त्यांच्या काळात आसाम मधील घुसखोरी रोखण्यासाठी ‘आसाम बचाव’आंदोलन, विवेकानंद जयंतीला युवाधिकार परिषद, समता ज्योत यात्रा, काश्मिर आंदोलन अशी आंदोलने झाली. या सर्व आंदोलनामध्ये चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व होते. त्यांच्या काळातच परिषदेने स्टुडंट कौन्सिलची निवडणूका लढवल्या आणि जिंकल्या. या सर्व कार्यकाळात चंद्रकांत पाटील यांच्या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे अनेक कार्यकर्ते संघटनेशी कायमचे जोडले गेले
भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केल्यावर २००४ मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये ते मंत्री झाले. त्यांनी या काळात महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषी, पणन ही खाती सांभाळली. अनेक लोकोपोयोगी निर्णय घेऊन आपली मोहर उठवली. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपसाठी अत्यंत खडतर होता. येथे त्यांनी कमळ फुलवले. सध्या ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. आपला वाढदिवस ते सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. दरिद्री नारायणाची सेवा हीच परमेश्वराची सेवा मानून ते राजकारणात सक्रिय आहेत.