वर्ल्ड सुपर मॉडेलमध्ये ऋषीकेश पाटील चौथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ल्ड सुपर मॉडेलमध्ये ऋषीकेश पाटील चौथा
वर्ल्ड सुपर मॉडेलमध्ये ऋषीकेश पाटील चौथा

वर्ल्ड सुपर मॉडेलमध्ये ऋषीकेश पाटील चौथा

sakal_logo
By

08456


वर्ल्ड सुपर मॉडेलमध्ये
ऋषीकेश पाटील चौथा

इचलकरंजी, ता. ९ ः अल्टईट्यूड ऑर्गनायझेशन अंतर्गत बँकॉक (थायलंड) येथे वर्ल्ड फिटनेस सुपरमॉडेल स्पर्धा झाली. यामध्ये विविध देशांमधून १३ स्पर्धक सहभागी झाले होते. आंतराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत इचलकरंजीचा ऋषिकेश पाटील याने भारताचे नेतृत्व करीत चौथा क्रमांक प्राप्त केला. पाच वर्षापासून ही स्पर्धा होत असून हा किताब मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
पाच दिवस वेगवेगळ्या प्रकाराच्या चाललेल्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी करून परिक्षकांचे लक्ष वेधून घेत गुण प्राप्ती केली. त्याच्यासोबत भारताचे राष्ट्रीय संचालक अमर शामू सोनावणे होते. त्यांचे ऋषीकेशला मार्गदर्शन लाभले. प्रविण खोंद्रे यांचे फिटनेस व व्यायामासंदर्भात मार्गदशन लाभले. वेशभूषा व लूकिंगसाठी मयुरेश अभ्यंकर यांचे सहकार्य लाभले. डॉ. अमित देशमुख यांची साथ मिळाली.
या किताबाने इचलकरंजीचा नावलौकिक ऋषिकेश यांनी जगभर केला. यापूर्वी ग्लोबल मॉडेल इंडिया अंतर्गत ओडीसा येथे नॅशनल कॉलीफाइर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी वर्ल्ड फिटनेस सूपरमॉडेल म्हणून भारताकडून त्याची निवड झाली होती. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन जीवनापासून या क्षेत्राशी ऋषीकेश हा संबंधित आहे. मॉडेलिंगच्या विविध स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला आहे.