इंग्रजी करिअर संधीवर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजी करिअर संधीवर मार्गदर्शन
इंग्रजी करिअर संधीवर मार्गदर्शन

इंग्रजी करिअर संधीवर मार्गदर्शन

sakal_logo
By

इंग्रजी करिअर संधीवर मार्गदर्शन
गडहिंग्लज : विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात करिअर करण्यासाठी भरपूर संधी आहेत. यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन देवचंद महाविद्यालयाचे प्रा. बी. जी. पाटील यांनी केले. शिवराज महाविद्यालयात इंग्रजी विषयातील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. प्रा. पाटील यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्‍व व रोजगार, नोकरीच्या संधी कोणत्या क्षेत्रात आहेत याची माहिती दिली. शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी मातृभाषेसोबत इंग्रजी भाषा शिकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. प्रा. प्राजक्ता बालेशगोल, डॉ. जी. जी. गायकवाड, डॉ. आर. पी. हेंडगे, डॉ. एस. बी. माने आदी उपस्थित होते. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डी. यू. जाधव यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. पौर्णिमा कुराडे यांनी करून दिला. प्रा. डी. व्ही. गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. व्ही. एस. दानवडे यांनी आभार मानले.