शिक्षक दिन
न्यू इंग्लिश स्कूल, सह्याद्री विद्यालयात
चंदगड ः येथील दि न्यू इंग्लिश स्कूल तसेच हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आर्या निळकंठ यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य देवळे, संजय साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. निबंध स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मोठ्या गटात गौतमी वाडकर, प्राची उसुलकर, आर्या गावडे यांनी तर लहान गटात समिक्षा पाटील, पल्लवी पेडणेकर, श्रेया बेरडे यांनी क्रमांक पटकावले. झोया मुल्ला, वेदांत उंबरे, दिशा देसाई, अनन्या गुरव, आर्षद कंडगोळी, जियान काझी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. टी. एस. चांदेकर, टी. व्ही. खंदाळे, व्ही. टी. पाटील उपस्थित होते. वेदिका उंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सुकन्या आनंदाचे यांनी आभार मानले. हेरे ः सह्याद्री विद्यालयात मुख्याध्यापक यु. एल.पवार, व्ही. आर. मोहनगेकर, शर्वरी पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. वैष्णवी कोल्हाळ यांनी प्रास्ताविक केले. सानिका धाटोंबे, वैष्णवी हेरेकर, हर्षल सावंत, श्रेयस गावडे, भास्कर पाटील, समीक्षा पवार, गहिनीनाथ चव्हाण, प्रांजल वारंग, शर्वरी पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. व्ही. एस. पाटील, जे. एस. तुपारे यांनी संयोजन केले. श्रेया गावडे व सोनम दळवी यांनी सूत्रसंचालन केले. शर्वरी पाटील यांनी आभार मानले.
-------------------
आजरा हायस्कूल
आजरा : आजरा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एस. आर. कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपमुख्याध्यापक बी. एम. दरी, पर्यवेक्षक एस. पी. होलम प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. जे. पी. नाईक यांच्या प्रतिमांचे पुजन झाले. संस्कृती कुंभार, आर्या गुप्ता यांनी राधाकृष्णन व डॉ. नाईक यांच्या कार्याची माहिती दिली. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. जी. डी. कांबळे, टी. एम. पाटील, व्ही. पी. हरेर, एम. एस. शेलार, व्ही. एन. वाशीकर, ए. व्ही. बापट, पी. आर. गावीत उपस्थित होते. अंजली केसरकर यांनी सुत्रसंचालन केले. बी. एम. दरी यांनी आभार मानले.
----------------
राजाभाऊ केसरकर हायस्कूल
भादवण : निंगुडगे (ता. आजरा) येथील राजाभाऊ केसरकर हायस्कूल व बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेजमध्ये एस. वाय. मेणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन झाले. मेणे, प्राचार्य के. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. वेळी पी. एस. पाटील, एल. पी. देसाई, एस. बी. जाधव, एन. जी. परीट, एस. एस. सरदेसाई, सी. टी. बागडी, व्ही. एम. कांबळे, एम. एस. चौगुले उपस्थित होते. ए. आय. कुरणे यांनी सुत्रसंचालन केले. एन. आर. निंबाळकर यांनी आभार मानले.
------------------
सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था
आजरा : गवसे (ता. आजरा) येथील बापूसाहेब सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक भगवान पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन झाले. या वेळी पवार यांनी विद्यार्थी व संस्थेला पुस्तके भेट देण्यात आली. चितळेचे उपसरपंच उदय सरदेसाई, संस्थेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी दि भुतल यांनी आभार मानले.
-------------------
व्यंकटराव महाविद्यालय
आजरा ः आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. प्राचार्य डॉ. सुभाष शेळके प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे उपाध्यक्ष आण्णा पाटील, सचिव शिवाजी कांबळे, सचिन शिंपी, अभिषेक शिंपी, मुख्याधापक आर जी कुंभार आदी उपस्थित होते.
-------------
सरदेसाई आदर्श हायस्कूल
आजरा ः गवसे (ता. आजरा) येथील बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते. निवृत्त शिक्षक भगवान पोवार प्रमुख उपस्थित होते. संचिता दिवेकर, अमृता आंबले, सानिका गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केली. रणजित सावंत, संदिप वाटवे ,विवियन मस्कारेनस,विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तरकर्मचारी उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. संतोष कालेकर यांनी आभार मानले.
-----------------
रवळनाथ हायस्कूल, देवर्डे
आजरा ः देवर्डे (ता. आजरा) येथील विद्यामंदिर व श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक नामदेव माईनकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पोर्णिमा बागडी, देवेंद्र शिखरे, नामदेव माईनकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुभाष सावंत, चंद्रकांत घुरे, राजेंद्र पाटील, महेश नावलगी, महादेव तेजम, सुनील पाटील, श्रीकांत पाटील, रेश्मा बोलके, सरोजिनी कुंभार उपस्थित होते. श्रावणी सोले हिने आभार मानले.
--------------