लोक अदालत
29403
लोकअदालतीत ६० हजार प्रकरणे निकाली
विधी व सेवा प्राधिकरणाचे आयोजन , ७५ कोटी १४ लाख रक्कमेची वसुली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः राष्ट्रीय सेवा व विधी प्रकरणाच्या आदेशानुसार जिल्हा व विधी प्राधिकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६० हजार ८१७ एवढी विक्रमी प्रकरणे निकाली काढून ७५ कोटी १४ लाख ८४ हजार रूपयांची वसुली केली.
जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी व कौटुंबिक प्रकरणे निकाली काढली. कुठल्याही न्यायालयात प्रलंबित नसलेली बँकांकडील थकीत वसुली, ग्रामपंचायत व महापालिका पाणीपट्टी, घरफाळा, फायनान्स कंपन्या व मोबाईल कंपन्यांकडील वसुली प्रकरणेही होती. न्यायालयात प्रलंबित ११ हजार ३३४ व दाखलपूर्व ८७ हजार ९७१ अशी एकूण ९९ हजार ३०५ प्रकरणे ठेवली होती. वकील, पक्षकारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने प्रलंबित २४६६, दावापूर्व ५८ हजार ९२ व स्पेशल ड्राईव्हमधील ३१९ अशी ६० हजार ८१७ प्रकरणे निकाली काढली.
मोटार अपघात दाव्यात जिल्हा न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांच्या पॅनेलवर दीपाली घाटगे यांना ५५ लाख भरपाई देण्याचा निर्णय झाला. ५ वे दिवाणी सह न्यायाधीश पी. बी. पाटील यांच्या पॅनेलसमोर चलनक्षम दस्ताऐवज कलम १३८ च्या दाव्यात एक कोटी पंधरा लाख रूपयांत तडजोड केली.
जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधील के. बी. अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश क्र.१ पी. एफ. सय्यद, जिल्हा न्यायाधीश क्र. २ एस. आर. साळुंखे, जिल्हा न्यायाधीश क्र. ३ एस. एस. तांबे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश बाफना यांच्या उपस्थितीत लोकअदालत झाली.
............
अशी झाली वसुली
दाव्याचा प्रकार एकूण प्रकरणे वसूल रक्कम
मोटर अपघात प्रकरणे १४५ ९ कोटी १३ लाख, ९० हजार ९००
पती-पत्नी दावे ४२
कलम ३८ अन्वये दावे ५१० ७ कोटी ५६ लाख ९ हजार ४५
दावापूर्व (घरफाळा, पाणीपट्टी) ५८ हजार ३२