
संत शिरोमणी पालखी सोहळा
29973
श्री संत शिरोमणी सेना महाराज पालखी सोहळा उत्साहात
कोल्हापूर, ता. ११ ः येथील नाभिक समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. रंकाळवेश बस स्थानक परिसरातील सेना महाराज वसतिगृहापासून पालखी मिरवणूक झाली. माजी नगरसेवक ईश्वर परमार, बाबासाहेब काशिद, अध्यक्ष नारायण पोवार, प्रभा टिपुगडे, राजाराम शिंदे, मनोहर झेंडे, मोहन चव्हाण, भारत माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पालखीला प्रारंभ झाला. सजवलेल्या बैलगाडीमध्ये छत्रपती शिवराय, संभाजीराजे, ताराराणी, छत्रपती शाहू महाराज, संत सेनामहाराज, नरवीर शिवा काशिद या महापुरूषांच्या प्रतिमा असलेले फलक लावले होते. मिरवणुकीनंतर समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा सत्कार झाला. अविनाश यादव, दीपक खराडे, दीपक माने, प्रमोद झेंडे, संग्राम काशिद, सुरेश फडतारे, सयाजी झुंजार, मोहन साळोखे, उदय माने, सतिश चव्हाण आदी उपस्थित होते.