घाळी महाविद्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी महाविद्यालय
घाळी महाविद्यालय

घाळी महाविद्यालय

sakal_logo
By

घाळी महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा
गडहिंग्लज : येथील घाळी महाविद्यालयात हिंदी दिनानिनिमित्त काव्यवाचन स्पर्धा झाल्या. प्र. प्राचार्य डॉ. शिवानंद मस्ती यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे प्रकाशन झाले. हिंदी विभागप्रमुख डॉ. सरोज बिडकर यांनी हिंदी दिनाचे महत्त्‍व सांगितले. काव्यवाचन स्पर्धेत दाही अत्तार, स्वाती तिबीले, अनामिका हत्तरकी, निकिता कोरे, राहुल नार्वेकर, विना खोत, मधुरा पाटील, प्राची सावंत, शिवानी डोमणे, रेणू पाटील, माधुरी सुतार, साक्षी माने आदींनी कविता सादर केल्या. संस्थेचे सहसचिव प्रा. गजेंद्र बंदी, डॉ. मस्ती यांचे भाषण झाले. उपप्राचार्य डॉ. नागेश मासाळ, डॉ. दत्ता पाटील, प्रा. विश्‍वनाथ पाटील, प्रा. महेश पाटील, प्रशासकीय अधिकारी हरिभाऊ पन्हाळकर आदी उपस्थित होते. डॉ. नीलेश शेळके यांनी परीक्षण केले. पाहुण्याचां परिचय प्रा. रोहिणी खंदारे यांनी केला. विना खोत, स्वाती वाळकी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद पाटील यांनी आभार मानले.