
घरफाळ्यात सप्टेंबर अखेर सुट
इचलकरंजी महापालिका वापरणे
--------------
घरफाळ्यात सप्टेंबर अखेर सूट
ऑगस्टपर्यंत साडेपंधरा कोटी वसूल ः ८३ लाख पाणीपट्टी जमा
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ ः इचलकरंजी महापालिकेची ऑगस्टअखेर थकबाकीसह १५ कोटी ५५ लाख घरफाळा वसुली झाली आहे. २३.७३ टक्के इतकी वसुली झाली आहे. यंदा थकबाकीसह तब्बल ६५ कोटी ५४ लाख इतके घरफाळा वसुली उद्दिष्ट आहे. नागरिकांनी घरफाळा वेळेत भरण्यासाठी सप्टेंबर अखेर २ टक्के सूट दिली आहे. त्यामुळे नागरिकांची घरफाळा भरण्यासाठी कर विभागात गर्दी होत आहे.
शहरात ५६ हजार ३४२ मिळकती आहेत. मिळकतधारकांना यंदाही घरफाळा वसुलीच्या नोटिसा दिल्या होत्या. यामध्ये नागरिकांनी वेळेत घरफाळा भरण्यासाठी प्रथमच सवलत योजना जाहीर केली होती. यामध्ये संयुक्त करावर जुलै अखेर ६, ऑगस्टअखेर ४ व सप्टेंबर अखेर २ टक्के अशी सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी वेळेत घरफाळा भरून योजनांचा लाभ घेतला आहे. सप्टेंबर अखेर २ टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर डिसेंबर अखेर पूर्ण घरफाळा भरावा लागणार आहे. त्यानंतर दरमहा २ टक्के दंड आकारणी होणार आहे. तुलनेने यंदा वेळेत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांची संख्या वाढली आहे. महापालिकेनेही याबाबत चार विभागीय कार्यालयांसह ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-----------
घरफाळा वसुली दृष्टिक्षेप
थकबाकी - २० कोटी ४ लाख
चालू मागणी - ४५ कोटी ४९ लाख
एकूण मागणी - ६५ कोटी ५४ लाख
-----
पाणीपट्टी वसुली दृष्टिक्षेप
थकबाकी - १० कोटी ८२ लाख
चालू मागणी - ८ कोटी ७२ लाख
एकूण मागणी - १९ कोटी ५५ लाख
-----
ऑगस्ट अखेर वसुली
तपशील * घरफाळा * पाणी पट्टी
थकबाकी * २ कोटी ६६ लाख * ५१ लाख ६९
चालू वसुली * १२ कोटी ८८ लाख * ३१ लाख ३८ हजार
एकूण वसुली * १५ कोटी ५५ लाख * ८३ लाख ७ हजार