गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

31232
गडहिंग्लज : आर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

‘आर्किटेक्टस''तर्फे अभियंता दिन
गडहिंग्लज : येथील आर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. तहसीलदार ऋषिकेत शेळके, मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे अध्यक्षस्थानी होते. सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. दत्तात्रय सुतार यांचे व्याख्यान झाले. असोसिएशनचे अध्यक्ष के. एस. घोरपडे, उपाध्यक्ष अजित उत्तूरकर, संदीप पाटील, खजिनदार राजेंद्र देशमाने यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते. सचिव राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
----------------
घाळीच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. बीए भाग एकमध्ये संतोष डिगेवाडी (७०.६७ टक्के), बीए भाग दोनमध्ये बाबूराव हजारे (७७.६७), बीए भाग तीनमध्ये गुरुनाथ राठोड (७९.२५), बीकॉम भाग एकमध्ये स्वप्नील मुरगी (७०.३३), बीकॉम भाग दोनमध्ये खलील खणदाळे (७१.१६), बीकॉम भाग तीनमध्ये इंद्रजित पाटील व अस्मिता सुतार (६८.९२), एमए मराठीमध्ये श्वेतांबरी सावंत (६८.७५) यांनी प्रथम क्रमांक मिळविले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांचे प्रोत्साहन मिळाले.
-------------------
शिंदे विद्यालयात आजी-आजोबा दिवस
गडहिंग्लज : येथील पालिकेच्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयात आजी-आजोबा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्प उधळणीत आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. ओवी गायन, उखाणे म्हणण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धा झाली. संगीत खुर्चीत आजी गटात हिराबाई गाडे-पाटील, विमल खोत, अनिता पोडदाळे तर आजोबा गटात आण्णाप्पा हरळकर, शिवाजी भोसले, रामचंद्र स्वामी यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. प्रदीप वडगावकर यांनी नटसम्राट एकांकिका सादर केली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर धनवडे, उपाध्यक्षा राणी शिंगे, सदस्य प्रकाश म्हेत्री, रंजना आडवकर, शिवाजी भोसले, दीपाली खोत, पूजा माने, आंबुताई धनवडे, विद्या चव्हाण, चंद्रशेखर सावरे आदी उपस्थित होते. नम्रता होडगे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. राजमाने यांनी आभार मानले.
-----------------
''रामलिंग''मध्ये आजी-आजोबांचे पाद्यपूजन
गडहिंग्लज : नूल (ता. गडहिंग्लज) येथील रामलिंग हायस्कूलमध्ये आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थितीत आजी-आजोबांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाद्यपूजन केले. शाळेतर्फे गायन-वादनाचा कार्यक्रम झाला. आजी-आजोबांनी मराठी व कन्नड भाषेत ओवी गायन केले. मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. ए. गायकवाड यांनी आभार मानले.
----------------
जागृती हायस्कूलमध्ये अभियंता दिन
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलमध्ये अभियंता दिनानिमित्त कार्यक्रम झाला. माजी विद्यार्थी सहायक निबंधक सुजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शाखांमधील संधी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नव्याने उद्योजक बनण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या धोरणांचीही माहिती त्यांनी दिली. प्राचार्य विजय चौगुले यांनी स्वागत केले. एम. एन. पाटील यांनी स्वागत केले. ए. एन. कमनुरे यांनी आभार मानले.