मजूर संघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजूर संघ
मजूर संघ

मजूर संघ

sakal_logo
By

मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा

प्रमोद पोवार : मजूर सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : ‘मजुरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील. भविष्यात मजूर भवन उभारले जाईल. तसेच, जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाला यावर्षी २४ लाख ६३ हजार रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष प्रमोद पोवार यांनी आज दिली. संघाच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
दरम्यान, रत्नप्रभा कॉम्लेक्समधील जागा खरेदीची आणि लेखा परिक्षणातील दोष दुरुस्तीची सभासदांना माहिती नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या श्री महालक्ष्मी हॉलमध्ये ही सभा झाली.

अध्यक्ष पोवार म्हणाले, ‘मजूर संस्थेला चांगले भवन असेल पाहिजे. यासाठी पाठपुरावा आणि प्रयत्न केले जातील.’ यावेळी संस्था प्रतिनिधी गटातील नारायण पवार यांनी लेखापरीक्षणात कोणती दोष-दुरुस्ती सुचवली आहे, हे वाचून दाखण्याची मागणी केली. यावेळी एकच मागणी प्रत्येक वर्षी केली जाते, असे सांगण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर सत्तारुढ गटाचे नेते मुकुंद पोवार, माजी संचालक शिवाजीराव खोत, कुस्तीमधील यशाबद्दल श्रावणी पाटील व स्पर्धा परीक्षतून मंत्रालयात नियुक्ती झालेल्या चैत्राली पाटील व स्मिता पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भिमराव नलवडे यांनी सभेचे कामकाज सुरू करा, विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करावी अशी मागणी केली. नारायण देसाई यांनी २०२१-२२ मधील लेखापरीक्षणाचे पाठविलेले दोष रत्नप्रभा कॉम्लेक्समधील जागेसाठी २० वर्षांपूर्वी ॲडव्हान्स दिला आहे. अद्याप खरेदी का केली नाही? असा सवाल केला. परंतु सत्तारुढ गटाच्या समर्थकांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मतांनी मंजूर केले. त्यानंतर जयसिंग चव्हाण, शिवाजीराव खोत यांची भाषणे झाली. अहवाल वाचन राजू हावळ यांनी केले. सूत्रसंचालन शाहू काटकर यांनी केले. आभार जयसिंग पाटील यांनी मानले.