भारतीय जनता पार्टी पंचायत राज निवड बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय जनता पार्टी पंचायत राज निवड बातमी
भारतीय जनता पार्टी पंचायत राज निवड बातमी

भारतीय जनता पार्टी पंचायत राज निवड बातमी

sakal_logo
By

31967
हेमंत पाटील
31968
रविंद्र मुतगी
31969
मारूती भागोजी


भाजप पंचायतराजच्या
विभागीय अध्यक्षपदी पाटील
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः भारतीय जनता पक्षाच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी हेमंत पाटील यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप यांच्या उपस्थित शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही निवड घोषीत करण्यात आली.
या बैठकीत पंचायत राज व ग्राम विकास विभागाच्या जिल्हा व अन्य नियुकत्त्याही जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर महानगर (दक्षिण) पंचायतराज अध्यक्षपदी रविंद्र मुदगी, कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी (उत्तर) मारुती भागोजी यांच्यासह सहसंयोजक (महानगर)पदी विजयकुमार कामत, संजय सावंत, विवेक कुलकर्णी, हेमंत कांदेकर, किरण उलपे, आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली. मंडळ संयोजक म्हणून देवरथ लोंढे, किरण तासगावे, रणजित शिंगाडे, राजेंद्र सुर्यवंशी, सुजाता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीस माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या आहेत.