चित्त समाधानी असल्यास आत्मानुभव
ich212.jpg
32295
तारदाळ : स्वामी समर्थ मंडळातर्फे आयोजित कीर्तन मालिकेत ओंकार महाराज सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
----------
चित्त समाधानी असल्यास आत्मानुभव
ओंकार महाराज सूर्यवंशी ः स्वामी समर्थ मंडळातर्फे कीर्तन मालिका
तारदाळ, ता. २१ : आत्मानुभव घ्यायचा असेल, तर प्रत्येक माणसाचे चित्त समाधानी असायला पाहिजे. आजच्या युवकांनी मंदिराकडे वळायला पाहिजे. पारंपरिकता आणि वारकरी संप्रदाय याचा अभ्यास केल्यास जीवन समृद्ध होईल. कीर्तन माणसाला समृध्द करते; पण त्यासाठी चित्त समाधानी असायला हवे. मनी नाही भाव, देवा मला पाव, असे होणार नाही. देवापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन ओंकार महाराज सूर्यवंशी यांनी केले.
येथील स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे प्रतिवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी बुधवारी कीर्तनाचे आयोजन केले होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, माजी सरपंच यशवंत वाणी, रणजित पोवार, सूर्यकांत जाधव, विकास बनणे, सतीश बनणे, विनोद चव्हाण, अशोक जाधव आदी उपस्थित होते. शैलेश जाधव यांनी आभार मानले.