निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

३४४६
नामवंत कुस्तीगीर
मारुती नाईक यांचे निधन
चंदगड, ता. २३ : निट्टूर (ता. चंदगड) येथील नामवंत कुस्तीगीर मारुती गणेश नाईक ( वय ७५) यांचे आज पहाटे निधन झाले. कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८४ मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते.
गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाईक यांनी उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबई गाठली. तेथील मोरारजी मिलमध्ये नोकरी आणि मुक्काम कोल्हापूर व्यायामशाळेत. लहानपणापासून कुस्तीची आवड. मुंबईत त्यांना कुस्तीपटू म्हणून घडण्याची संधी लाभली. शिडशिडीत शरीरयष्टीमुळे प्रतिस्पर्धी पैलवानला याला सहज पराभूत करू असे वाटायचे. मात्र कुस्ती सुरू झाली की त्यांनी कधी मात केली समजायचं नाही. डोळ्यांचे पारणे फिटायचे. त्यांनी एकदाही पराभव पाहिला नाही. निट्टूरसह परिसरात कुठेही मैदान असो त्याना पंच म्हणून आमंत्रण असायचे. अलीकडे आजारी पडल्यानंतर मैदानात त्यांना यायला जमायचे नाही. त्यावेळी पंचमंडळी त्यांच्या घरी जाऊन फेटा बांधून यायचे. त्यानंतर मैदान सुरू व्हायचे. त्यांच्या मागे पत्नी, चार भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
चौकट
विधवा प्रथेला मूठमाती.....
नाईक यांच्या निधनानंतर सरपंच गुलाब पाटील, निवृत्त पोस्ट अधिकारी घनश्याम पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे प्रबोधन केले. विधवा प्रथेला मूठमाती देण्याचे आवाहन केले. त्याला कुटुंबीयांनीही प्रतिसाद दिला.

32985
उदय पाटील
कोल्हापूर : रंकाळा टॉवर, दत्त मंदिराजवळील उदय आनंदराव पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, सून असा परिवार आहे.

32986
शैलजा वर्धमाने
कोल्हापूर : शाहूपुरी दुसरी गल्लीतील शैलजा शीतल वर्धमाने (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

32987
कल्पना जाधव
कोल्हापूर : तटाकडील तालीम मंडळ परिसरातील कल्पना सुनील जाधव (वय ४५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

04760
शांताबाई तांबट
म्हाकवे : येथील शांताबाई आप्पा तांबट (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ich223.jpg
32909
डॉ. दिलीप देशमुख
इचलकरंजी ः येथील डॉ. दिलीप लालासाहेब देशमुख (वय ७३) यांचे निधन झाले. इचलकरंजी मेडिकल असोसिएशन व इचलकरंजी रोटरी रोटरी क्लबचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

04837
रघुनाथ घाटगे
कोनवडे : निळपण (ता.भुदरगड) येथील रघुनाथ कृष्णा घाटगे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

04835
डॉ. बजरंग नलवडे
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील डॉ. बजरंग रामचंद्र नलवडे (ता. ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) विकास कॉलनी, गारगोटीत आहे.

03976
जिजाबाई कमळकर
मुरगूड : मळगे बुद्रुक (ता. कागल) येथील जिजाबाई तुकाराम कमळकर (वय १०४) यांचे निधन झाले.

06357
इंदूबाई कोळी
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील आडकेवाडीतील इंदूबाई सिद्धू कोळी (वय ९०) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पाच मुली, मुलगा, सुना, नातवंडे व पतरवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

33154
मच्छिंद्रनाथ माने
कोल्हापूर ः कसबा बावडा, लाईन बाजार येथील मच्छिंद्रनाथ बाबूराव माने (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन रविवार (ता. २४) आहे.

03491
आनंदी पाटील
सोळांकूर : लिंगाचीवाडी (ता. राधानगरी) येथील आनंदी दिनकर पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

02809
सुनीता जाधव
कोडोली : येथील कपिलतीर्थ मार्केट परिसर जाधव गल्लीतील सुनीता मारुती जाधव (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

04758
शेवंता डाफळे
म्हाकवे : येथील शेवंता महादेव डाफळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.

02177
हिराबाई पाटील
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील हिराबाई मारुती पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

33155
रंजन नांदणीकर
कोल्हापूर ः निपाणी येथील रंजन चंद्रकांत नांदणीकर (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

00910
संपतराव पाटील
प्रयाग चिखली : येथील संपतराव विठ्ठल पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

04796
राहुल शिंगे
कुंभोज : येथील राहुल सुभाष शिंगे (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्‍नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.