
माजी विद्यार्थी हेच शरद इन्स्टिट्युटची ताकद
jsp120
34963
यड्राव : येथे शरद इंजिनिअरिंगच्या माजी मेळाव्यादरम्यान अनिल बागणे यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
‘माजी विद्यार्थी हेच शरद इन्स्टिट्यूटची ताकद’
अनिल बागणे ः ‘माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, जुन्या आठवणीत रंगला दिवस
दानोळी, ता. १ ः कॉलेजचे माजी विद्यार्थी हेच शरद इन्स्टिट्यूटची खरी ताकद आहे. शरदचे विद्यार्थी हे जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. ही संस्था विद्यार्थ्यांनी निर्माण केली आहे. विद्यार्थी आणि पालकांमुळेच संस्थेला अनन्यसाधारण यश मिळाले आहे,’ असे प्रतिपादन संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी केले.
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी शरद पॅटर्न, शिक्षणासोबत संस्कृती, शिस्त, सोयी-सुविधा यामुळे आमचे शिक्षण व त्यानंतरचे जीवन सुकर व आर्थिक प्रगत कसे झाले, हे सांगितले. विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी शेअर केल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागाला भेट देऊन प्राध्यापकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विभागामध्ये प्रयोगशाळा व इतर सोयी-सुविधांची माहिती घेतली. प्रा. कल्याणी जोशी यांनी स्वागत केले. प्रा. पंकज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थी विभागाचे समन्वयक डॉ. सागर पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. कौस्तुभ शेडबाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वासिम शेख आदी उपस्थित होते.