संजीवन, काडसिध्देश्‍वरला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवन, काडसिध्देश्‍वरला विजेतेपद
संजीवन, काडसिध्देश्‍वरला विजेतेपद

संजीवन, काडसिध्देश्‍वरला विजेतेपद

sakal_logo
By

34968
गडहिंग्लज : शासकीय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजयी संजीवन पन्हाळा, तर दुसऱ्या छायाचित्रात श्री काडसिद्धेश्‍वर विद्यालयाला बाळासाहेब घुगरी, अरुण पाटील, प्रदीप साळोखे यांच्या हस्ते करडंक देऊन गौरविण्यात आले. (छायाचित्र : ओंकार जाधव)

संजीवन, काडसिद्धेश्‍वरला विजेतेपद
शासकीय जिल्हास्तरीय फुटबॉल; पेठवडगावला उपविजेतेपद, मानेसह पाटील सर्वोत्कृष्ट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : शासकीय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मुलींच्या विभागात एकोणीस गटात संजीवन पब्लिक स्कूल, तर सतरामध्ये श्री काडसिद्धेश्‍वर विद्यालयाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अनुक्रमे पेठवडगावच्या सायरस पुनावाला स्कूल आणि संजीवन स्कूलचा सहज पराभव केला. पन्हाळ्याची दिव्या माने, कणेरीची स्वरूपा पाटील यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकाविला. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे येथील शिवराज महाविद्यालय, एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. क्रीडाशिक्षक संघटना, युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि साधना विद्यालयाने स्पर्धेचे संयोजन केले.
एकोणीस गटात संजीवन स्कूलने सायरस पुनावाला स्कूलचा चार गोलनी मोठा पराभव केला. संजीवनच्या सानिया गोरूले, दिव्या माने यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. नवोदित पुनावाला स्कूलला सामन्यात अखेरपर्यंत खेळात सूर सापडला नाही. तिसऱ्या क्रमाकांच्या सामन्यात अब्दुललाटच्या गुरुकुल स्कूलने करवीर संघाचा सडनडेथवर ३-२ अशी मात केली. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत होता.
सतरा वर्षे गटात बलाढ्य श्री काडसिद्धेश्‍वर स्कूलने संजीवन स्कूलचा दोन गोलनी सहज पाडाव केला. काडसिद्धेश्‍वरची आदिती ढेरेने दोन मैदानी गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली. स्थानिक साई इंटरनॅशनल स्कूलने शिरोळच्या बालाजी स्कूलचा टाब्रेकरमध्ये २-१ असा पराभव करून तिसरा क्रमांक मिळविला. कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे प्रदीप साळोखे, अर्बन बँकेचे बाळासाहेब घुगरी, क्रीडाधिकारी अरुण पाटील, प्राचार्य रफिक पटेल यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. निवड समिती सदस्य दीपक कुपन्नावर, रघु पाटील, भक्ती पवार यांच्यासह पंचांचा सत्कार झाला. संपत सावंत यांनी स्वागत केले. साधनाचे अरविंद बार्देस्कर, नितीन पाटील, राजाराम माने, विनायक शिंदे, अमित साळोखे, अमित शिंत्रे, महेश काळे यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते.
------------
चौकट
पन्हाळा, कणेरीचे वर्चस्व
या स्पर्धेवर पन्हाळ्याच्या संजीवन स्कूल आणि कणेरीच्या श्री काडसिद्धेश्‍वर यांनी तीनपैकी प्रत्येकी दोन गटांत विजेतेपद पटकाविले. मुख्यत्वे मुलांत संजीवन, तर मुलींत काडसिद्धेश्‍वरने हुकूमत कायम राखली. अंतिम सामन्यात या संघांनी प्रतिस्पर्ध्याला तोंडही वर काढू दिले नाही.