श्री नटराज अकॅडमी

श्री नटराज अकॅडमी

Published on

16075
कथ्थकमधून अवतरला शब्द-ताल-सुरांचा अर्थ
रसिक मंत्रमुग्ध; श्री नटराज ॲकॅडमीतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर , ता. ५ ः संवादिनीच्या मंजूळ सुरावटी, तबल्याचा तालबद्ध ठेका, अर्थपूर्ण शब्दरचना अशा शब्द-सूर-तालांचा अर्थ कथक नृत्यातून येथे अवतरला. क्षणाक्षणाला बदलत्या भावमुद्रा, विलक्षण चपळाईने घडणाऱ्या पदन्यासाने उपस्थितांना थक्क केले. निमित्त होते येथील श्री नटराज ॲकॅडमी आयोजीत नृत्यवेध कथ्थक नृत्य मैफलीचे... या सुंदर नृत्याविष्काराने रसिकांना मोहिनी घातली.
गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंग मंदिरात नृत्य मैफल रंगली. गुरू आमिषा करंबळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी डॉ. विनोद ठाकूर देसाई, अभिनेते सुधीर मोघे प्रमुख उपस्थित होते. ‘नटराज’च्या शिष्यांना मंजिरी यांच्या रूपात उत्तम गुरू लाभला. नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती असते. त्यातील आनंद मंजिरी या आपल्या शिष्यांना देत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे लागले,’’ अशा भावना करंबळेकर यांनी व्यक्त केल्या.
नटराज अकॅडमीच्या संचालिका मंजिरी फडणीस-हसबनीस यांच्या संकल्पनेतून नृत्यशिष्यांनी कथ्थकचे एकाहून एक सरस असे नृत्याविष्कार सादर केले. घटनस्थापनेचे औचित्य साधून विविध देवींची आराधना करणारे गीत, त्यासोबत कथक नृत्याविष्कार सादर केला. नवदुर्गांच्या शौर्यला या नृत्याव्दारे वंदन करण्यात आले. त्यापुढील सत्रात तालाचे सौंदर्य दर्शवणारा ताल त्रितालमधील कथ्थकच्या रचना सादर केल्या. गायन मंजिरी हसबनीस यांनी केले. मधूसुदन शिखरे यांनी संवादीनी तर मयूरेश यांनी तबला साथ केली. नृत्य विशारदच्या शिष्या गायत्री कुलकर्णी, तेजस्विनी भोसले, जाई अभ्यंकर, पूर्वा सारडा, आर्या पाटील, सानिका निंबाळकर, वृक्षाली औंधकर, श्रावणी बेहरे, शर्वरी इंगवले, सृष्ठी पाटील, केतकी खोत आदींनी नृत्ये सादर केली. सुधांशू नाईक यांनी सूत्रसंचलन केले. वेदा सोनुले यांनी आभार मानले.

चौकट
नृत्याविष्कातून गुरुवंदन
श्री नटराज ॲकॅडमी मंगळवार पेठतर्फे शास्त्रीय नृत्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यात नृत्य शिक्षण घेणाऱ्या शंभरावर शिष्यांनी नृत्यमैफलीत नृत्याविष्कार सादर करीत गुरूंना वंदन केले. हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी नृत्य शिष्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com