16547
...
उद्याची मराठी जगभरात
कर्तृत्वाचा डंका वाजवेल
अविनाश धर्माधिकारी ः दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी - माजी विद्यार्थी संघ वर्धापन दिन उत्साहात
कोल्हापूर, ता. ५ ः ‘मराठी भाषेत संकल्पना, शब्द तयार करण्याची ताकद आहे. उद्या मराठीसुद्धा संपूर्ण जगभरात कर्तृत्वाचा डंका वाजवेल,’ असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघ संयुक्त वर्धापनानिमित्त आयोजित शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
धर्माधिकारी म्हणाले, ‘आज पालक म्हणतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे सर्व ठीक आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून इंग्रजीतून शिक्षण हवे. मराठीची पाळेमुळे संस्कृत, प्राकृतमध्ये आहेत. आपली भाषा सशक्त आहे. नवी संकल्पना, शब्द तयार करण्याची ताकद आपल्या भाषेत आहे. ती ताकद आपण विसरून गेलो आहोत. मनाने, भाषेने इंग्रजी शिक्षणाचे गुलाम बनून राहिलो आहोत. पाश्चात्त्य देशात जे ज्ञान आहे. ते सर्व ज्ञान मराठीतूनही देता येते. दोन हजारांहून अधिक वर्षांचा वारसा आहे. उद्याची मराठीसुद्धा संपूर्ण जगात कर्तृत्वाचा डंका वाजवेल. यामध्ये वाटचाल व्हावी. यात प्रायव्हेट हायस्कूलचा सिंहाचा वाटा असावा.’
ते पुढे म्हणाले, ‘प्रायव्हेट एज्युकेशनची स्थापना आणि संस्थापक विभूते गुरुजी, अ. वि. जोशी गुरुजी यांच्या कष्टामुळे आज आपण या ठिकाणी आहोत. या संस्थेचा कारभार मराठीतून चालला आहे. हे अभिमानास्पद आहे.’ दरम्यान, संस्थेतील गुणवंत शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे माजी अध्यक्ष भुपेंद्र शहा यांनी संस्थेचे आतापर्यंतचे कार्य व माजी विद्यार्थी म्हणून मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन उदय सांगवडेकर यांनी केले, तर कोषाध्यक्ष जी.एस.जांभळीकर यांनी केले. यावेळी नियामक मडंळाचे व्हाईस चेअरमन डॉ. सुनील कुबेर, कार्यवाह शरयू डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

