अंबाबाई काकडा विधी
22484
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गुरुवारी पहाटेपासून काकडा प्रज्वलित करण्याच्या विधीला प्रारंभ झाला.
श्री अंबाबाई मंदिराचे
शिखर काकड्याने उजळले
त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणार विधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : श्री अंबाबाई मंदिरातील काकडा प्रज्वलित करण्याच्या विधीला आजपासून प्रारंभ झाला. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे हा विधी होणार आहे. या विधीनुसार मशालीच्या मंद उजेडात पहाटे दोनच्या सुमारास मंदिराच्या शिखराच्या टोकावर काकडा प्रज्वलित केला जातो. प्रत्येक वर्षी नरकचतुर्दशीच्या पहाटे काकडा विधीला प्रारंभ होतो.
देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, संतोष खोबरे, संजय जाधव-कसबेकर, प्रसाद लाटकर, सुकृत मुनीश्वर, रोषण नाईक, निवास चव्हाण आदींच्या उपस्थितीत आजपासून या विधीला प्रारंभ झाला. मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देव-देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला गेला. सनईचा मंद सूर व गायनसेवा अशा वातावरणात हा विधी झाला. त्यानंतर देवीची पहाटे काकड आरती झाली.
दरम्यान, या विधी काळात देवीचा अभिषेक पहाटे साडेपाच व सकाळी साडेअकराला होणार आहे. रथसप्तमीपर्यंत पहाटे चार वाजता देवीची काकडआरती होईल व रात्री सव्वादहाला होणारी शेजारती सव्वानऊला होईल. मंदिर परिसरातील देवीचा दर शुक्रवारचा पालखी सोहळा पौर्णिमेपर्यंत साडेनऊऐवजी पावणेनऊला सुरू होईल.
--------------
चौकट
असा होतो विधी...
मंदिराचे शिखर साधारणपणे चाळीस फूट उंच आहे. एवढ्या उंच शिखरावर केवळ शिखराच्या दगडी टप्प्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडे पाठ करून चढावे लागते. बोचऱ्या थंडीत एका हातात पेटता काकडा व दुसऱ्या हाताने दगडी टप्प्याला धरत शिखरावर एका दमात पोहोचण्यासाठी वेगळेच कसब लागते. आता नवीन पिढीही या विधीसाठी सज्ज झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

