विधान सभा निवडणूक
सक्षम उमेदवार देण्यात रिपब्लिकन गटांसमोर पेच
एकही जागा नाही ः अपरिचित उमेदवाराला मतदान करण्याची वेळ
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात मागासवर्गीयांच्या मतांची संख्या जवळपास एक ते दीड लाखाच्या घरात आहे. यातील बहुतांशी मतदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गटांना जोडले आहेत. यातील आठवले गटाने हातकणंगलेतील एका जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली. हा अपवाद वगळता अन्य मतदारसंघात रिपब्लिकनचा भक्कम उमेदवार नसल्याने पूर्वापार मतदारांना अपरिचित उमेदवाराला मतदान करण्याची वेळ आली आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटांनी भूमिका जाहीर करीत महायुती, तर कोणी महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.
पंचवीस वर्षांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जोगेंद्र कवाडे गट, रिपब्लिकन पार्टीचा गवई गट, दलित महासंघ, बहुजन समाज पार्टी, बामसेफ आदी विविध पक्ष, संघटनांचे कार्य व गावोगावी शाखा होत्या. दोन महिन्यांतून एखादा दुर्बल घटकांच्या हिताचा विषय घेऊन रोजगार, घरकुल, आरक्षण, शिक्षण, सामाजिक न्याय अशा विविध प्रश्नांवर मोर्चा, धरणे, आंदोलने होत होती.
पाच वर्षांत गवई गटाचे प्रा. विश्वास देशमुख, आठवले गटाचे ॲड. पंडित सडोलीकर यांचे निधन झाले. त्यांच्या त्या पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाची धुरा नेटाने सुरू ठेवली. आठवले गटाचे संघटन मजबूत झाले. उर्वरित गटाचे केवळ अस्तित्व आहे.
चौकट
नवे नेतृत्व तयार करण्यात अपयश
नेत्यांनी पक्ष संघटना वाढवणे, समाज बांधवांच्या सामुदायिक हितावर सरकारला धारेवर धरणारी आंदोलने कमी झाली. किंबहुना कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे, सर्व समाजघटकांच्या हिताचा पक्षीय अजेंडा तयार करणे, आदी बाबींचा गृहपाठ करण्यात रिपब्लिकन नेते कमी पडल्याचे दिसत आहे. परिणामी नवे नेतृत्व अपवादाने तयार झाले. त्यांच्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असली, तरी पाठिंब्याबाबत साशंकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

