कार्यकर्त्यांसाठी निष्ठा नेत्यांच्या निष्ठेचे काय ?
निष्ठा कार्यकर्त्यांसाठी.. नेत्यांसाठी काहीही चालते...
जिल्ह्यातील राजकरणाचे चित्र ः सोयीनुसार पक्ष प्रवेश
लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः कार्यकर्त्यांनो एकनिष्ठ रहा, कट्टर रहा असे भाषणातून उपेदश देणाऱ्या नेत्यांना एकनिष्ठा आहे की नाही असा प्रश्न जिल्ह्यातील राजकरणात उपस्थित झाला आहे. ज्या नेत्यांसाठी कार्यकर्ते मैत्री तोडतात, गल्लीत विरोध पत्करतात अशा कार्यकर्त्यांसाठीच निष्ठा आणि कट्टरता राहिली आहे.
जिल्ह्यात काही दिवसांत एक विद्यमान आमदार, तीन माजी आमदारांनी सोयीनुसार पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे निष्ठा केवळ कार्यकर्त्यांसाठी आहे, नेत्यांसाठी काहीही चालते अशी स्थिती झाली आहे.
पक्षाशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रत्येक नेता कार्यकर्त्यांना प्रत्येक भाषणात उपदेशाचे डोस पाजतो. आपण कसे योग्य आहे, पक्ष कसा चांगला आहे, पक्षातील नेते किती कर्तबगार आहेत, याचे तुणतुणे वाजवितो. मात्र, आपल्यावर वेळ आली की रात्रीत कुस बदलल्याप्रमाणे आमदार, माजी आमदार, नेते मंडळी पक्ष बदलत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पदापर्यंत पोचविले, दिवसरात्र राबले त्यांना कोणी विचारतही नाही. काही ठराविकांना विश्वासात घेवून आपण करीत असलेले कसे बरोबर आहे हे दाखवून देण्याचा नेत्यांचा प्रयत्न अलीकडे दिसून येत आहे. यानंतर मात्र ज्या नेत्यांचे गुणगाण गात होते त्यांच्याविरोधात आग ओकतात तेव्हा त्यांची निष्ठा कोठे जाते हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे.
पूर्वी राजकीय पक्ष विचारांवर चालत होते. पक्षातील नेते, कार्यकर्ते विचारांसाठी कट्टर होते. ठराविक पक्षाचे नाव घेतले तर त्यांची विचारसारणी डोळ्यासमोर दिसत होती. आजही काही पक्षांतील कार्यकर्ते आपल्या विचारावर ठाम आहेत. काही नेत्यांनी त्यांची पूर्ण हयात पक्षाच्या विचारांसाठी घालविल्याची अनेक उदाहरणे आहेत. सत्ता असो किंवा नसो, पक्ष आणि पक्षाच्या विचारांची बांधिलकी नेते, कार्यकर्ते राखून आहेत. मात्र, स्वार्थासाठी काही नेत्यांनी ‘जनतेच्या हितासाठी’ म्हणून पक्ष बदलल्याचे अलीकडे दिसते. यामध्ये मंत्र्यांपासून ते माजी आमदारांपर्यंतची नावे पुढे आहेत. जिल्हा प्रमुखांपर्यंत अनेकांच्या नावाची यादी तयार होत आहे.
चौकट
पक्ष बदललेले जिल्ह्यातील नेते
आमदार जयश्री जाधव - भाजप, कॉग्रेस, शिवसेना शिंदे गट
माजी आमदार उल्हास पाटील - स्वाभिमानी शेतकरी संघटना ते शिवसेना व परत संघटना
माजी आमदार सुजित मिणचेकर - शिवसेना ते स्वाभिमानी शेतकरी संघटना
माजी आमदार के. पी. पाटील - अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना ठाकरे गट
माजी आमदार संजय घागटे - शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना ते पुन्हा शिवसेना ठाकरे गट आणि आता महायुतीला पाठिंबा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

