मतदान केंद्र निहाय मनुष्यबळाचे वाटप
१६ हजार २३७ कर्मचाऱ्यांची सरमिसळ पूर्ण
विधानसभा मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचे वाटप, मतदानाआधी नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज कर्मचाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना विधानसभा मतदारसंघाचे वाटप करण्यात आले. मतदानाच्या दोन दिवस आधी तिसरे रॅण्डमायझेशन होणार आहे. त्यानंतर कोणत्या मतदान केंद्रावर कोण असणार, याची निश्चिती होईल.
ही प्रक्रिया आज जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. १६ हजार २३७ कर्मचाऱ्यांना विधानसभा मतदारसंघ दिले. यावेळी सामान्य निरीक्षक स्वेतिका सचन, अशोक कुमार, मिर तारीक अली, सुहास एस., विश्व मोहन शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, अपर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गौरव कवाडे उपस्थित होते.
चौकट
विधानसभा मतदारसंघ* एकूण कर्मचारी* महिला व दिव्यांग कर्मचारी* पुरुष कर्मचारी*
चंदगड* १७८०* ४६८* १३८५
राधानगरी* १९५०* ४६८* १४८२
कागल* १६६१* ५८६* १०७५
कोल्हापूर दक्षिण* १६९०* ४७५* १२१५
कोल्हापूर उत्तर* १४७४* १०४५*४२९
करवीर* १४५९* ४३४* १२२५
शाहूवाडी* १ ५८६* ४७७* १२२५
हातकणंगले*१५९५* ५७५* १०२०
इचलकरंजी*१३५१* ४६०*८९१
शिरोळ* १४९१* ५४८* ९४३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

