जनतेच्या प्रश्नांनी ‘निर्भया’ भयभीत
22565
पाटणे फाटा ः पोलिस कर्मचाऱ्यांना अडवणुकीबद्दल विचारणा करताना अॅड. संतोष मळवीकर.
....
जनतेच्या प्रश्नांनी ‘निर्भया’ भयभीत
पाटणे फाट्यावरील प्रकार ः पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांची अडवणूक
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३१ ः बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे निर्भया पथकाकडून वाहनधारकांची अडवणूक सुरू होती. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष मळवीकर यांनी घटनास्थळी येऊन विचारणा केली. सुमारे अर्धा तास नागरिक आणि पोलिसांत आरोप- प्रत्यारोप सुरू होते. शेवटी पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांना पाचारण करावे लागले. दोषींवर कारवाई करू असे आश्वासन देत त्यांनी या प्रकरणावर पडदा पाडला.
निर्भया पथकाचा लोगो असलेली पोलिस गाडी भर रस्त्यात आडवी लावून तीन महिला पोलिस व एक पोलिस कर्मचारी वाहनधारकांना अडवत होते. कागदपत्रांचा विचारणा करून थेट पैशाची मागणी करीत होते, असा आरोप वाहनधारक व प्रवाशांनी केला. सुरुवातीला महिला पोलीसांनी मोठा कांगावा केला. आम्ही पोलिस असल्याच्या आविर्भावात सांगितले. मात्र अॅड. मळवीकर यांनी साध्या पेहराव्यात, गळ्यात ओळखपत्रही नसताना अशा प्रकारे वाहनधारकांना अडवता येते का, अशी विचारणा केली. दुचाकीस्वारांच्या चाव्या काढून घेतल्यामुळे अनेकजण तिथेच थांबून होते. त्यांनी आपल्याला शिवराळ भाषेत महिला कर्मचाऱ्यांनी दटावल्याचे सांगितले.
मळवीकर यांनी वरिष्ठाना जागेवर बोलवण्याचा आग्रह धरल्यावर पोलिस निरीक्षक विश्वास पाटील घटनास्थळी आली. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. योग्य कारवाई न झाल्यास याच नागरीकांना घेऊन आंदोलन करु असा इशारा मळवीकर यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

