डॉ. वरूटे यांना इंग्लंड मधील संस्थेकडून मानद पदवी

डॉ. वरूटे यांना इंग्लंड मधील संस्थेकडून मानद पदवी

Published on

31436
इंग्लंडमधील संस्थेकडून
डॉ. वरूटे यांना मानद पदवी 

कोल्हापूर, ता. १३ : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांना इंग्लंडस्थित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, ग्लासगोकडून ‘एफआरसीएस’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्सचे रजिस्ट्रार डॉ. अभय राणे यांच्याहस्ते आग्रा येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ.  वरूटे यांना पदवी प्रदान करण्यात आली.
रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, ग्लासगो ही ४४७ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. संस्थेमार्फत युकेमध्ये विविध विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री देण्याचे काम केले जाते. त्याचप्रमाणे जगभरामध्ये शैक्षणिक, रुग्णसेवा, संशोधन आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्यावतीने मानद ‘एफआरसीएस’ ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. डॉ वरूटे यांनी आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शल्यचिकित्सा, लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. पदवीबद्दल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार  सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश मुदगल, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com