कोवाड - उद्या आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड - उद्या आरोग्य शिबीर
कोवाड - उद्या आरोग्य शिबीर

कोवाड - उद्या आरोग्य शिबीर

sakal_logo
By

कोवाडला आज मोफत आरोग्य शिबिर
कोवाड, ता. २३ : बेळगावचे केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र व जे. एन. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (ता. २ ४ ) सकाळी ९.३० ते २ पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. डॉ. अलम प्रभू यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करतील. आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी व आरोग्य सेवेबाबतच्या शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी डॉ. प्रभाकर कोरे यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने केएलई प्रशासनाने चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांत शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. शिबिरात हृदयरोग, युरॉलॉजी, आर्थो जॉईंटस्, शस्त्रचिकित्सा, औषधे, ऑफथॉल, चर्मरोग, कान, घसा, नाक तज्ज्ञांकडून मोफत तपासणी होऊन उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाईल. शिबिरात मोफत ईसीजी व रक्त तपासणी होईल. महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना व खासगी विमा योजनेची माहिती दिली जाईल. रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केएलई विश्वविद्यालयाने केले आहे.