Mon, June 5, 2023

कोवाड - सत्कार
कोवाड - सत्कार
Published on : 1 March 2023, 1:27 am
अजित पाटील यांचा सत्कार
राजगोळी खुर्द : येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक अजित कल्लापा पाटील यांचा ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याने सत्कार झाला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डुक्कुरवाडकर होते. मुख्याध्यापक शामकांत देसाई यांनी स्वागत केले. अशोक नौकुडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच सुनंदा कडोलकर उपस्थित होत्या. अजित पाटील यांचा निवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार झाला. यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र मोटूरे, प्रणिता गुरव, प्रदीप दड्डीकर, वसंत जोशिलकर, संजीवनी गुरव, रितु भांदुर्गे, परशुराम ढवळे उपस्थित होते. भैरवनाथ भोगण यांनी सूत्रसंचालन केले.