कोवाड - विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड - विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू
कोवाड - विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू

कोवाड - विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

00987ः संतोष बच्चनेहट्टी
kwd२२
0988
बुक्किहाळ (ता. चंदगड) ःतरुणाच्या मृत्यूनंतर शुक्रवारी घटनास्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल मोदी, संजय मगदूम व अजित कांबळे यांना ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत असा घेराओ घातला होता.


उच्च दाब वाहिनीमुळे तरुणाचा मृत्यू
बुक्किहाळमध्ये घटना; महावितरण अधिकाऱ्यांना सात तास घेराओ

सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २ ः बुक्किहाळ (ता. चंदगड) येथे उसाच्या शेतात बैलजोडीने नांगरत असताना विजेचा धक्का बसून आज तरुणाचा मृत्यू झाला. संतोष सुरेश बच्चेनहट्टी (वय २१) असे त्याचे नाव आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. चंदगड पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. संतोषच्या मृत्यूने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना मध्यरात्रीपर्यंत रोखून ठेवले होते. महावितरणने पंचनामा पंचनामा करून नुकसानभरपाई जाहीर करावी, त्याशिवाय अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तब्बल सात तास अधिकारी ग्रामस्थांच्या वेढ्यात होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः घरची गरिबीची परिस्थिती असल्याने संतोषने बारावीचे शिक्षण झाल्यानंतर अधूनमधून शेती कामे करत होता. सध्या उसाला भरती मारण्याचे काम सुरू आहे. संतोष देवाचे शेत नावाच्या शेतात सकाळपासून बैलजोडीने नांगरत होता. शेतात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे डांब आणि ओढणी आहे. नांगरत असताना बैलांचे जू ओढणीत अडकले. ते काढताना अचानक विजेचा धक्का बसल्याने संतोष जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला.
संतोषच्या मृत्यूची बातमी समजताच बुक्किहाळ परिसरात शोककळा पसरली. शेकडो लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. विद्युत डांब व लोंबकळणारी ओढणी पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. महावितरणने तत्काळ वीजपुरवठा खंडित केला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल लोदी, सहायक अभियंता संजय मगदूम, अजित कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
गेल्या वर्षी याच ठिकाणी बच्चनेहट्टी यांच्याच दोन म्हशींचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. आज कर्त्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना घेराओ घातला. पंचनामा करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी करत अधिकाऱ्यांना रोखून धरले. पंचनामा होत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला. विशाल लोदी यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून माहिती दिली. रात्री साडेदहा वाजता कोल्हापूरहून महावितरणचे लाईन निरीक्षक युवराज वाघ व नागेश बसरीकट्टी आले. त्यांनी माहिती घेऊन योग्य कार्यवाही करू, असे सांगितले; पण संतप्त ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मध्यरात्री उशिरापर्यंत महावितरणचे अधिकारी जबाब घेण्याचे काम करत होते.

घरच्या दोन म्हशींचा गत वर्षी
येथेच विजेच्या धक्क्यानेच मृत्यू
गेल्या वर्षी सुरेश बच्चेनहट्टी यांच्या दोन म्हशींचा याच ठिकाणी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. आज पुन्हा विजेच्या धक्क्याने कर्त्या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

कारभार कधी सुधारणार?
महावितरणचा हा आंधळा कारभार कधी सुधारणार, असा संतप्त सवाल उपस्थितांनी केला.
००००००००००००००००००००००००००००


फोटो ः मृत संतोश बच्चनेहट्टी
kwd२२
कोवाड ः घटनास्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल मोदी, संजय मगदूम व अजित कांबळे यांना ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत असा घेराओ घातला होता.
kwd२३
--------------------------------
अशोक पाटील...........................कोवाड
ता. २-३-२३