
कोवाड - रेल्वे अपघातात ठार
B01012
...
लक्किकट्टेतील तरुणाचा
मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू
कोवाड, ता. ७ ः लक्किकट्टे (ता. चंदगड) येथील एका तरुणाचा मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झाला. रेल्वेत चढताना हात सुटून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल सुरेश थोरवत (वय ३५) असे त्याचे नाव आहे.
सोमवारी (ता.६) रात्री ९ च्या दरम्यान मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशन ते गोरेगांव रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली. धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला ही दुदैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली. बोरिवली रेल्वे पोलिसांत घटनेची नोंद आहे. मंगळवारी रात्री उशिरा लक्किकट्टे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल थोरवत हा मुंबईत बोर्ड सेक्युरिटीमध्ये कामाला होता. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी परताना राम मंदिर रेल्वे स्टेशन ते गोरेगांव रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वेत चढताना त्याचा हात सुटल्याने अपघात झाला. धावत्या रेल्वेत सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी राहुलच्या अपघाताची माहिती मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना दिली. राहुलची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबईला गेला होता. गेल्या दहा वर्षांपासून तो मुंबईत सिक्युरिटीमध्ये नोकरी करत होता. दोन वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. सध्या पत्नीसह तो मुंबईतील नालासोपारा येथे राहत होता. राहुल हा एकुलता एक होता. चार वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मागे आई, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे.