विजेच्या धक्क्याने वायरमन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्क्याने वायरमन जखमी
विजेच्या धक्क्याने वायरमन जखमी

विजेच्या धक्क्याने वायरमन जखमी

sakal_logo
By

विजेच्या धक्क्याने वायरमन जखमी
कोवाड ः येथे कागणी फिडरवरील ११ केव्ही विद्युत वाहिनीवर काम करताना विजेचा धक्का लागून महावितरणचा वायरमन जखमी झाला. रामदास बाळू परबकर (वय २७) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता कोवाड येथे ही घटना घडली. गडहिंग्लज येथे एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परबकर गेल्या दीड वर्षापासून वीज वितरण कंपनीच्या कोवाड कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. गुरुवारी दुपारी ते कागणी फिडरवरील दुंडगे गावच्य दिशेला कोवाड हद्दीत ताम्रपर्णी नदीलगत विद्युत पोलवर जंप मारण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांना हाताला विजेचा धक्का बसल्याने जखमी झाले.
..........