कोवाड - उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड - उद्घाटन
कोवाड - उद्घाटन

कोवाड - उद्घाटन

sakal_logo
By

01044
आशा होमिओपॅथी क्लिनिकची
गडहिंग्लजला शाखा सुरू
गडहिंग्लज, ता. २२ ः डॉ. बी. एस. भोसले यांचे येथे होमिओपॅथी क्लिनीक गडहिंग्लजसह सीमाभागातील रुग्णांना आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रवीण केसरकर यांनी केले.
मिरजेतील आशा होमिओपॅथी हॉस्पिटलतर्फे डॉ. बी. एस. भोसले यांचे येथे केसरकर हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी क्लिनिक सुरू झाले. डॉ. भोसले यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी डॉ. प्रवीण केसरकर बोलत होते. डॉ. शैली भोसले-शर्मा, डॉ. प्रवीण पाटील उपस्थित होते.
डॉ. केसरकर म्हणाले, ‘डॉ. भोसले यांनी आशा होमिओपॅथीच्या पुणे, मुंबई, मिरज, कोल्हापूर, चिपळूण, सांगोलात शाखा सुरु केल्या. गडहिंग्लज व सीमाभागातील रुग्णांच्या मागणीनुसार त्यांनी येथे सातवी शाखा सुरु केली.’ डॉ. भोसले म्हणाले, ‘आशा फौंडेशनतर्फे रुग्णसेवेसह होमिओपॅथीचा प्रचार, प्रसारासाठी कार्यशाळा, शिबिरे होतात. ग्रीस, लंडनसह दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा व महाराष्ट्रातील अनेक शहरांतून २६०हून अधिक सेमिनार घेऊन मार्गदर्शनाचे काम सुरू आहे. गडहिंग्लजला महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सेवा देईन.’ यावेळी आनंद क्षीरसागर, डॉ. अर्चना पाटील, डॉ. सत्यजीत देसाई, प्रसाद करमळकर, सचिन अत्याळी, डॉ. पूनम पाटील, डॉ. गौरी भोसले, डॉ. विठोबा नाईक, डॉ. लक्ष्मण पाटील, डॉ. महेश चोथे, डॉ. आर. बी. चौगुले व डॉ. देवन्नावर उपस्थित होते. डॉ. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.