चंदगडी नाट्य महोत्सव आजपासून

चंदगडी नाट्य महोत्सव आजपासून

चंदगडी नाट्य
महोत्सव आजपासून
कोवाड, ता. २० ः हलकर्णी (ता.चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळ व प्रोसेस इन थिएटर यांच्यावतीने चंदगडी नाट्य महोत्सवाला उद्या (ता. २१) पासून कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणावर सुरवात होत आहे. सिनेअभिनेते प्रसाद पंडित यांच्या उपस्थित पाचव्या नाट्य महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, भरमूण्णा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संगीत नाटक तुका म्हणे आता, २२ तारखेला मुंबईच्या जिराफ थिएटरचे स्टार, २३ रोजी साई कलामंच कुडाळ निर्मित दोन अंकी नाटक बत्ताशी, २४ ला मुंबईच्या एन श्वेतांरी तालीमचे उदध्वस्त धर्मशाळा, २५ रोजी मुंबईच्या अनुतोष क्रिएशन्सचे पोलिस पोलिस हे दिर्धांक नाटक व ३७ गुण, २६ रोजी अभिनय कल्याण निर्मित साम्राज्य, २७ रोजी ऍबस्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवलीचे हायब्रीड व आजरा हायस्कूलचे वारी, २८ रोजी मुंबईच्या शिव गणेश प्रोडक्शनच्या येथे ओशाळला मृत्यू या नाटकाने समारोप होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com