चंदगडला विकासाचा चेहरा देण्याचे स्वप्न

चंदगडला विकासाचा चेहरा देण्याचे स्वप्न

01131
कोवाड : येथे विकासकामांचे उद्‍घाटन करताना आमदार राजेश पाटील. शेजारी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, अशोकराव देसाई आदी.
----
चंदगडला विकासाचा चेहरा देण्याचे स्वप्न
आमदार राजेश पाटील; कोवाड येथे आमदार फंडातील विविध विकासकामांचा प्रारंभ

कोवाड, ता. २८ : चंदगड मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाचे काम घेऊन जाणे हा अजेंठा डोळ्यासमोर ठेवून वाटचाल चालू आहे. राजकारणाचा विचार न करता सामान्य माणसाची प्रगती आणि त्याच्या उन्नतीसाठी काम सुरु आहे. खोट्या कामांचे श्रेय घेण्याची माझी प्रवृत्ती नाही. विकासकामांतून पुढे आलेला मी कार्यकर्ता आहे. चंदगड मतदारसंघाला विकासाचा चेहरा देण्याचं स्वप्न सत्यात उतरवणार, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.
येथील आमदार फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकराव देसाई होते. माजी राज्यमंत्री भरमू पाटील, सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, एस. एल. पाटील उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, ‘राजकीय गट, तट बाजूला ठेवून प्रत्येक गावाला निधी मंजूर करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मतदारसंघात ४०० कोटींवर निधी आणला. अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लोकांच्यात वावरणारा मी कार्यकर्ता असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. केवळ भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल करण्याची आमची वृत्ती नाही तर विकासकामातून जनतेला विश्वास देण्याचे काम केले.’
भरमूआण्ण पाटील यांनी चंदगड तालुक्यात पाण्याच्या सोयी झाल्याने शेतीचा विकास झाल्याचे सांगून कोवाड भागाच्या विकासाच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. चंद्रकांत कुंभार, राहुल देसाई, विष्णू आडाव, मायाप्पा पाटील (मलतवाडी), सुर्यकांत पाटील, एम. एन. पाटील, आदम मुल्ला, विनोद पाटील, नारायण कणुकले, रामचंद्र व्हन्याळकर, ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील उपस्थित होते. प्रा. ए. टी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. उपसरपंच पुंडलिक जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com