कोवाड - रस्त्या साठी आंदोलनाच्या पवित्र्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड - रस्त्या साठी आंदोलनाच्या पवित्र्यात
कोवाड - रस्त्या साठी आंदोलनाच्या पवित्र्यात

कोवाड - रस्त्या साठी आंदोलनाच्या पवित्र्यात

sakal_logo
By

01159
कोवाड ः माणगाव ते बागिलगे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
--------------------------

माणगाव - बागिलगे रस्ता खड्ड्यांत
प्रवासी वैतागले; वाहनचालक आंदोलनाच्या पवित्र्यात

कोवाड, ता. १० ः माणगाव ते बागिलगे (ता. चंदगड) रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्ग काढत जाणारे प्रवासी वैतागले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. रस्ता नादुरुस्त असल्याने पर्यायी मार्गाने वाहने वळविली जात आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी अजून रस्त्याच्या कामाला सुरवात नसल्याने संतापलेले प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
माणगांव ते बागिलगे रस्ता बेळगाव-वेंगुर्ला मार्गाला तांबुळवाडी फाट्याला जोडतो. पूर्व भागातील लोकांना चंदगड व कोकणात जाण्यासाठी जवळचा
रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची व प्रवाशांची सतत गर्दी असते. माणगांवपासून साधारणतः तीन किलोमीटरचा रस्ता उखडून गेला आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांतून या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्याची माहिती समजते.
मंजुरी मिळाली म्हणून की काय सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडेच दुर्लक्ष केले आहे. दररोज प्रवास करणारे प्रवासी वैतागले आहेत.
खड्ड्यातून मार्ग काढणे प्रवाशांच्या जीवावर येत आहे. त्यामुळे माणगाव, डुक्करवाडी, बागिलगे, मलगडमधील नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. रस्त्याचे बांधकाम होणार नसेल तर दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी होत आहे. खड्ड्यांमुळे रात्री दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. याला कोण जबाबदार, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे. अधिकारी डोळे बंद करुन खुर्च्यांवरुन बसले आहेत का, अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असते तर प्रवाशांचा मनस्ताप वाचला असता. रस्त्याच्या बांधकामाला मंजूरी मिळाली असली तरी पावसाळा जवळ येत असल्याने यावर्षी या रस्त्याच्या कामाला सुरवात होईल असे वाटत नाही. त्यामुळे पावसाळ्यात मोठे हाल होणार असल्याचा भीती व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून किमान रस्त्याची दुरुस्ती करुन वाहतूक सुरक्षित करावी,अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
-------------------------------------
कोट
माणगांव ते बागिलगे रस्त्याची अवस्था अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी पाहावी. दिवसा प्रवास करणे कठीण बनले आहे. रात्री लोकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर आंदोलनाची भूमिका घेऊ.
- बाळाराम फडके, माणगांव