कालकुंद्रीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कालकुंद्रीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

01183
कालकुंद्री ः येथील सरस्वती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला.
----------
कालकुंद्रीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कोवाड ः कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती हायस्कूलच्या १९७४-७५ च्या शाळेच्या पहिल्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. तब्बल ४८ वर्षानंतर विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र जमले. माजी विद्यार्थी अशोक कल्लापा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व बाबूराव मुतकेकर, जी. एस. पाटील व मुख्याध्यापक सुभाष बेळगांवकर यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. सर्वजण शाळेच्या व एकमेकांच्या आठवणीत रममान झाले. अॅड. जेशॅन करवाल, मरगुणी पाटील, महादेव जोती पाटील, अशोक पाटील, किशन देसाई, जोतिबा पाटील, राजाराम मोहनगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरोजिनी पाटील, एलिझाबेद डिसोजा व गोदावरी या माजी विद्यार्थीनी भावनांना वाट करुन दिली . राजाराम मोहनगेकर यांनी सुत्रसंचालन केले. गुंडोपंत देसाई यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com