पाण्याचे स्त्रोत जास्त असलेल्या ठिकाणी जॅकवेल खुदाई करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याचे स्त्रोत जास्त असलेल्या 
ठिकाणी जॅकवेल खुदाई करावी
पाण्याचे स्त्रोत जास्त असलेल्या ठिकाणी जॅकवेल खुदाई करावी

पाण्याचे स्त्रोत जास्त असलेल्या ठिकाणी जॅकवेल खुदाई करावी

sakal_logo
By

पाण्याचे स्त्रोत जास्त असलेल्या
ठिकाणी जॅकवेल खुदाई करावी
कागणी ग्रामस्थांची मागणी; जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे
कोवाड, ता. २८ : कागणी (ता. चंदगड) येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत जॅकवेल खुदाईचे काम सुरू आहे. सदर जॅकवेलला पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने जॅकवेल खुदाईचे काम थांबवावे व भूजलतज्‍ज्ञ व गावातील जाणकारांच्या मार्गदर्शनाने पाण्याचे स्त्रोत जास्त असलेल्या ठिकाणी जॅकवेल खुदाई करावी, अशी मागणी कागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत दोन कोटींची पाणी योजना मंजूर आहे. गावाच्या दक्षिण बाजूला नाळवा नावाच्या शेतात जॅकवेलची जागा निश्चित करुन खुदाईचे काम सुरू केले आहे. नव्याने सुरू होणाऱ्या योजनेमुळे पुरेशा पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहेत. तिथे जॅकवेलचे बांधकाम करावे. सध्या ज्या ठिकाणी जॅकवेलचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी गावातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीने भूजलतज्‍ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जॅकवेलचे बांधकाम सुरू करावे.
----------------
कोट
जॅकवेलचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे. तिथे पाण्याचे स्त्रोत कमी असल्याचे आमच्या बघण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय निधी वाया जाऊ नये. भूजलतज्‍ज्ञांनी आम्हाला त्या ठिकाणी पुरेशे पाणी असल्याबद्दल लेखी पत्र द्यावे.
- नरसिंग बाचूळकर, कागणी, ग्रामस्थ
----------------
जॅकवेलचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे. तिथे पूर्ण पाणी उपसा केल्यानंतर चोवीस तासात एक लाख ६७ हजार लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्या जागेला त्याला मंजुरी दिली. पण ग्रामसभा तहकूब झाल्याने येत्या चार दिवसांत पुन्हा गावसभा बोलवून हा विषय मांडणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ.
- सुहास बामणे, सरपंच, कागणी