ग्रामविकास अधिकारी पाटील यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामविकास अधिकारी पाटील यांचा सत्कार
ग्रामविकास अधिकारी पाटील यांचा सत्कार

ग्रामविकास अधिकारी पाटील यांचा सत्कार

sakal_logo
By

01198
कोवाड : जी. एल. पाटील यांचा निवृत्तीनिमित्त चंद्रकांत बोडरे यांनी सत्कार केला. कल्लापण्णा भोगण, अनिता भोगण, पुंडलिक जाधव उपस्थित होते.
-----------
ग्रामविकास अधिकारी पाटील यांचा सत्कार
कोवाड, ता. ३१ : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील यांचा निवृत्तीचा कार्यक्रम जिल्हा परिषद माजी सदस्य कल्लापण्णा भोगण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सरपंच अनिता भोगण, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे उपस्थित होते.
श्री. पाटील हे ३० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. सत्काराला उत्त्तर देताना ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गटविकास अधिकारी बोडरे यांनी ग्रामविकास अधिकारी पाटील हा एक तळमळीचा अधिकारी व कर्तव्यदक्ष सेवक असल्याचे सांगितले. उपसरपंच पुंडलिक जाधव यांनी स्वागत केले. रंजना पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यांचा सपत्नीक सत्कार झाला. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त गावच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या लक्ष्मी सुबराव कांबळे व नंदा अनंत कांबळे या महिलांचा सत्कार केला.
मंडल अधिकारी शरद मगदूम , अमोल देवकुळे, शिवाजी आडाव, पांडूरंग जाधव, विष्णू आडाव, विठ्ठल वांद्रे, पशुविकास अधिकारी पुजा सावंत, वसंत व्हन्याळकर, तंटामुक्त अध्यक्ष जोतिबा बागिलगेकर, श्रीकांत पाटील, देवेंद्र शेट्टी आदी उपस्थित होते. भैरु भोगण यांनी सुत्रसंचालन केले. आभार सुवर्णा पाटील यांनी मानले.