कालकुंद्रीतील वाचनालयास पुस्तके भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालकुंद्रीतील वाचनालयास पुस्तके भेट
कालकुंद्रीतील वाचनालयास पुस्तके भेट

कालकुंद्रीतील वाचनालयास पुस्तके भेट

sakal_logo
By

01221
कोवाड ः कालकुंद्री येथील ज्ञानदीप वाचनालयाला कालकुंद्री शिवजयंती उत्सव- २०२३ च्या कार्यकर्त्यांनी पुस्तके भेट दिली.
-----------
कालकुंद्रीतील वाचनालयास पुस्तके भेट
कोवाड, ता. ८ ः कालकुंद्री (ता. चंदगड) येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कालकुंद्री शिवजयंती उत्सव-२-२३ यांच्यामार्फत कालकुंद्री येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला पाच हजार रुपयाची ऐतिहासिक पुस्तके भेट दिली.
श्रीमानयोगी, छावा, दुर्योधन, बुध्दभूषण, समासम्राट, झंझावात, रणखैदळ, इथे ओशाळला मृत्यू, शिवरायांच्या शौर्य कथा, रायगड, पावनखिंड, भद्रकाली, ताराराणी, क्रांतीसुर्य, अलेक्झांडर द ग्रेट, शहीद भगतसिंग, मराठे कालीन शौर्यकथा, श्रीमंत बाजीराव पेशवे, महाराणी येसूबाई, राजमाता जिजाऊसाहेब, सेनापती हंबीरराव मोहिते इत्यादी पुस्तके दिली. किटवाड येथील यश उत्तम पाटील या विद्यार्थ्याने भाषण केले. विनायक मुर्डेकर, संदीप कांबळे, संपत पाटील, युवराज पाटील, झेविअर क्रुझ यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप कांबळे, गुंडू पाटील, सुदर्शन पाटील, सुरज पुजारी, संदीप पाटील, दिलीप पाटील, उत्तम पाटील ,परशराम पाटील, महेश कोकीतकर आदी उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव शिवाजी पाटील यांनी स्वागत केले. जे. के. पाटील यांनी प्रास्ताविकात वाचनालयाच्या कार्याची माहिती दिली. युवराज पाटील यांनी सुत्रसंचालन केले. पी. एस्. कडोलकर यांनी आभार मानले.