शाहू विचार जागर यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू विचार जागर यात्रा
शाहू विचार जागर यात्रा

शाहू विचार जागर यात्रा

sakal_logo
By

०९३५०
०९३५१


शाहू विचार जागर यात्रा दिशादर्शक ठरेल
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; शताब्दी समिती, सलोखा मंचतर्फे ‘कोल्हापूर ते मुंबई’ जागर यात्रेचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘कोल्हापूर ते मुंबई’ दरम्यान काढण्यात येत असलेली शाहू विचार जागर यात्रा भविष्यात दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती व राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे आयोजित ‘कोल्हापूर ते मुंबई’ शाहू विचार जागर यात्रेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या डिजिटल पोस्टरचे अनावरण झाले. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून यात्रेचा प्रारंभ झाला.
शाहू महाराज म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने महाराष्ट्र नव्हे तर देशाने वाटचाल करायला हवी. सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्या स्थितीत समाजात शांतता ठेवण्यासाठी शाहू महाराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वांतर्गत शाहूंच्या विचारांचे स्मरण करणे समाजाच्या हिताचे आहे.’’
बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दसरा चौक, बावड्यातील शाहू जन्मस्थळ यांसह ठिकठिकाणी चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, यशराजराजे छत्रपती, इंद्रजित सावंत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, चंद्रकांत यादव, गणी आजरेकर, लाला गायकवाड, कॉ. दिलीप पवार, हर्षल सुर्वे, शिवाजी मोरे उपस्थित होते.

उद्या मुंबईत सांगता

शाहू महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाहूंच्या जन्मभूमीतून हा विचार यात्रारथ मुंबईच्या दिशेने आज रवाना झाला. कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे, मुंबई असा चित्ररथाचा मार्ग आहे. ५ मे रोजी सकाळी १२ वाजता मुंबईतील चेंबूर येथे हा शाहू विचार जागर यात्रा रथ पोहोचणार आहे. दुपारी चार वाजता खेतवाडी गल्ली नंबर १३, कामाबाग चौक, गिरगाव येथील स्मृती स्तंभाजवळ शाहूंना अभिवादन करून विचार यात्रा रथाची सांगता होईल. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्तंभाचा लोकार्पण सोहळा होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09818 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top