जुना बुधवार मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना बुधवार मिरवणूक
जुना बुधवार मिरवणूक

जुना बुधवार मिरवणूक

sakal_logo
By

19154
1915३
शिव-शाहूंच्या कृतिशील विचारांचा जागर
शिवजयंती मिरवणूक; संयुक्त जुना बुधवार पेठेतर्फे सामाजिक प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : शिव-शाहूंच्या कृतिशील विचारांना अभिवादन करत संयुक्त जुना बुधवार पेठेतर्फे काढण्यात आलेली शिवजयंती मिरवणूक आज अविस्मरणीय ठरली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमात बालपणापासून का शिकवला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत इतिहासावर आधारित चित्र फलकांनी मिरवणुकीत प्रबोधनाचा जागर घातला.
धनगरी ढोलचा ठेका, मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके, व बालचमूचा सळसळता उत्साह मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
मालोजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अॅड. महादेवराव आडगुळे, प्रकाश गवंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस तोरस्कर चौकातून सुरुवात झाली. शिवकालीन युद्धकलेचा थरार चौकात सादर झाला. धनगरी ढोलच्या ठेक्यावर मिरवणूक हळूहळू पुढे सरकली. जुना बुधवार तालीम, सोन्या मारुती चौक, मणेर मस्जिद, महापालिका चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक आल्यानंतर हलगी, घुमक व कैताळाच्या कडकडाटावर पट्टा, तलवार, फरी गदका, चौमुखी बगल लाठी पवित्रा, दुहाती पट्टा, दुहाती लाठी, लिंबू काढणीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले.
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा रणसंग्राम, दहशतवाद संपवा, छत्रपती संभाजी महाराज, करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी, मराठा आरक्षण, राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक सोहळा, शिवरायांचे स्वराज्य, शिवरायांना घडविणाऱ्या घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ, शाहिस्तेखान हल्ला असे इतिहासावर आधारित चित्रफलक मिरवणुकीत होते. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते पुन्हा जुना बुधवार तालीम असा मिरवणुकीचा मार्ग राहिला.
मिरवणुकीत समितीचे अध्यक्ष मकरंद स्वामी, कार्याध्यक्ष ओंकार काशीद, उपाध्यक्ष संदीप देसाई व मुबीन मुश्रीफ, जयशंकर नष्टे, संदीप कुंडले, अर्जुन आंबी, सम्राट यादव, जुना बुधवार पेठ तालमीचे अध्यक्ष नागेश घोरपडे, उपाध्यक्ष संदीप राणे, सचिव सुशील भांदिगरे, महावीर पवार, दिगंबर फराकटे अमोल डांगे, अनिल निकम, उदय भोसले, नामदेव आवटे, संजय पाटील, अभिजीत पाटील, प्रशांत कुरणे सहभागी झाले होते.


पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी
मिरवणुकीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषेत बग्गीत बसलेल्या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले. लोककलांची परंपरा सांगत कडकलक्ष्मी, वासुदेव, तुतारीवादक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले.

मणेर मस्जिदतर्फे पुष्पवृष्टी
मुस्लिम समाज मणेर मस्जिदतर्फे मिरवणुकीचे जोरदार स्वागत केले. शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश येथे देण्यात आला. शिवभक्तांच्या अल्पोपहाराची येथे व्यवस्था करण्यात आली होती.


गटार गंगेची पंचगंगा कधी होणार
लोकप्रतिनिधींनो, काळम्मावाडी थेट पाणी योजना, महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, असे आवाहन केले. त्याचबरोबर गटार गंगेची पंचगंगा कधी होणार, अशी विचारणा फलकाच्या माध्यमातून करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09820 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top