शिवकालीन सुवर्ण होनचे शुक्रवारी प्रदर्शन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवकालीन सुवर्ण होनचे शुक्रवारी प्रदर्शन...
शिवकालीन सुवर्ण होनचे शुक्रवारी प्रदर्शन...

शिवकालीन सुवर्ण होनचे शुक्रवारी प्रदर्शन...

sakal_logo
By

शिवकालीन सुवर्ण होनचे शुक्रवारी प्रदर्शन...


कोल्हापूर, ता. ३ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त शिवकालीन सुवर्णहोन शुक्रवारी (ता. ६) नागरिकांना पाहण्यासाठी खुला होत आहे. भवानी मंडपातील जुना राजवाडा येथे सकाळी दहा वाजता त्याचे उद्‌घाटन होईल. रात्री आठपर्यंत तो पाहण्यासाठी खुला असेल.
शिवछत्रपती महाराजांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी स्वराज्याचे सुराज्य घडविण्याचा संकल्प केला होता. किल्ले पन्हाळगड, कोल्हापुरातील जुना राजवाडा व नर्सरी बाग येथे शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक मंदिरे उभी केली. तसेच, सिंधुदुर्ग येथे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी उभारलेल्या शिवरायांच्या मंदिरास शाहू महाराजांनी भव्य सभा मंडप बांधला व सिंधुदुर्गवरील शिवरायांच्या हाताच्या ठशाची रूप्याची प्रतिकृती करून त्याची आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केली. पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या अश्वारूढ मूर्ती व स्मारकाचा पाया रचला.
........
चौकट
महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त सुवर्ण होन प्रदर्शित केला जाणार आहे. गेले कित्येक वर्षांपासून दुर्गराज रायगडावर वास्तव्य असणाऱ्या विठ्ठल धाकटू औकिरकर कुटुंबीयांच्या देवघरात पूजेत असणारा हा सुवर्ण होन त्यांनी ६ जून २०२१ ला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे सुपूर्द केला. हा सुवर्ण होन जगभरातील शिवप्रेमींना प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
..........
संदीप.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09821 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top