
अन्य आवृत्तीसाठी
19432
अनंत खासबारदार,
करिअरसाठी क्रिएटिव्हीटी महत्त्वाची
निर्मिती जाहिरात संस्थेचे अनंत खासबारदार म्हणाले, ‘मोबाईल चालना देतो, तसा बधीरही करतो. जाहिरात क्षेत्रात सर्व घटकांचा विचार करावा लागतो. जाहिरातपुरती क्रिएटिव्हिटी मर्यादित नाही. ज्ञान, क्रिएटिव्ह, संवेदनशीलतेतून जाहिरातीला आकार मिळतो. जाहिरातीचे स्वरूप बदलले आहे. ती करताना मानवी मेंदूचा कस लागतो. वाचन विविधांगी असणे गरजेचे आहे. करिअरसाठी क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करा. मिळणारी माहिती कलात्मक पद्धतीने व्यक्त करायला शिकलात, तर तुमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. क्रिएटिव्हिटी जगण्यामध्ये आणा.
--
- जाहिरात कमी वेळेतील, साधी व प्रभावी हवी
- एका ओळीत व्यक्त व्हायला शिका
- मोबाईल बाजूला ठेवून विचार करा
- तुमचा मेंदू क्रिएटिव्ह ठेवा
- नव्या उमेदीने देश घडविण्यासाठी पुढे या
--------------------------------------------
प्रवीण चव्हाण
19435
ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्यालाच वाव
युनिक अॅकॅडमीचे एक्झिक्युटिव्ह कोर्स डायरेक्टर प्रवीण चव्हाण म्हणाले, ‘ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्याला प्रत्येक क्षेत्रात वाव आहे. आज सुतारही कोट्यवधी रुपये मिळवत आहेत. देशाला महासत्ता करण्यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेत उतरणाऱ्या युवकांनी समस्यांचा सामना करण्याची तयारी ठेवावी. समाजात चांगले काम करणाऱ्यांनी परीक्षा दिली पाहिजे. त्यांचे नेतृत्व दीर्घकाल परिणामकारक असेल.’
- केवळ एमपीएससी, यूपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षा नव्हे
- सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधा
- मेंटॉर निवडून इंटरनेटचा वापर करा
- नोकरीतून सामाजिक प्रतिष्ठा मिळेल
- कौशल्ये अधिकाधिक मिळवा
------
19436
उदय गायकवाड
वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा
पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड म्हणाले, ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा. एखादी गोष्ट तर्क व निरीक्षणाच्या आधारावर तपासून घ्या. संस्कारांच्या दबावातून बाहेर या. समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक केली पाहिजे. एखादी समस्या सोडवताना निर्णय घेणे आवश्यक आहे. भलेही तो चुकला तरी चालेल. अंधश्रद्धेला मात्र थारा देऊ नका. नेहमी का, कधी, कसे, कोणामुळे, कोठे असे प्रश्न स्वतःला विचारा, निरीक्षण करा. प्रयोगांती निष्कर्षावर या. केवळ कोणाच्या सांगण्यावर विश्नास ठेवू नका. अंधश्रद्धा ही सर्व क्षेत्रात असते. त्यापासून लांब रहा.
- पर्यावरणाबाबत जागृती करा
- पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करा
- पाण्याचा जपून वापर करा
- पाणी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या
- चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवा
-------------------------
19437
आवडेल त्यातच करिअर करा
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. शीतलकुमार रवंदळे म्हणाले, ‘करिअरच्या वाटा कोणत्या आहेत, हे समजून घ्या. एक्स्पर्टबरोबर संवाद साधा. आयटी कंपन्या रोजगार देणाऱ्या आहेत. यूट्यूबवर करिअरच्या विविध जाहिराती आहेत. त्याची जरूर माहिती घ्या. मात्र, करिअर करताना स्वतःला जे आवडेल त्यातच करिअर करा. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधा. महाविद्यालयीन वेळेनंतर तुमच्याकडे खूप वेळ असतो. तो सत्कारणी लावा. शिकत असताना भविष्यात आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.’
--
- परिसरातील कंपन्या, कारखान्यांना भेट द्या
- वेळेचा सदुपयोग करा
- इंग्रजी बिझनेस भाषा
- बेरोजगारी ही मोठी समस्या
- अनेक सामाजिक प्रश्नांची निर्मिती
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09823 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..