
अन्य आवृत्तीसाठी
अभिनेता रमेश परदेशी
19447
अभिनय रक्तात असावा लागतो
अभिनेता रमेश परदेशी म्हणाले, ‘माझा खेळाडूचा पिंड आहे. वडील इंजिनिअरिंगशी संबंधित. त्यांना मी नाटकात काम म्हणजे फालतुगिरी वाटायची. मी अभिनयात पहिले बक्षीस मिळविल्यानंतर ‘सकाळ’मध्ये पहिली बातमी छापून आली. ५० जणांनी कौतुक केले. घरचा व्यवसाय सांभाळून कला क्षेत्रात काम करत राहिलो. वाणिज्य, कायदा, एमबीएची पदवी मिळवत अभिनयाची आवड जोपासली. मुळशी पॅटर्न टर्निंग पाईंट ठरला. त्याआधी रेगे, देऊळबंद, दृश्यम चित्रपटात काम केले.’
या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अभिनय रक्तात असावा लागतो.
-----------------------
- सोशल मीडिया दुधारी शस्त्र
- अभिनय पैसे देऊन शिकता येत नाही
- अनधिकृत ऑडिशनला जाऊ नका
- फोन करणाऱ्यांचे प्रोफाईल चेक करा
- आई-वडिलांना सांगितल्याखेरीज काही करू नका
--------------------------
19449
प्रा. अर्जुन आबिटकर
प्रश्न सोडवले तर राजकारणात यश
जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, ‘सेवाभावी संस्थेची स्थापना करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. पाणी अडवा पाणी जिरवा, जलस्वराज्य उपक्रम केले. लोकांच्या अडचणी सोडवत होतो. त्याचा परिणाम म्हणून कमी वयात सरपंच झालो. आजचे चित्र बदलले असून, एखाद्याचा आठवीला असतानाच बॅनर लागतो. त्या वयात तो चांगल्या गतीने पुढे जाईल, असे नाही. समाजातील प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले, तर राजकारणात आपोआप यश मिळते.’
- चांगला कार्यकर्ता व्हा. समाजकारणात झोकून द्या
- सामाजिक प्रश्न अनेक
- नेतृत्वाची झलक दाखविण्यास सज्ज व्हा
- अभ्यासातून स्वतःची आयडेंटिटी तयार करा
--
व्यक्त व्हायला शिका
राष्ट्रवादीचे अनिल घाटगे म्हणाले, ‘राजकारण व समाजकारण एका रथाची दोन चाके आहेत. ऐंशीच्या दशकात तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये शिकत होतो आणि दहावीत असताना संप केला. महाविद्यालयीन निवडणुका लढवल्या. आंदोलने केली. चांगल्या व्यवस्थेत छोटीशी बातमी, पेपर वाचन करा. माणसं पाठिंबा देतात, फक्त व्यक्त व्हायला शिका. घराणेशाहीचे राजकारण असले तरी समाज चांगल्या कार्यकर्त्याला स्वीकारतो. स्वतःला सिद्ध केले पाहिजे.’
-----
- सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख तयार करा - प्रत्येक प्रश्न स्वतःचा प्रश्न म्हणून सोडवायला शिका
- समाजकारण व राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू
- झोकून देऊन काम करा
- अन्यायाविरोधात लढायला शिका
---------------------------
19453
समरजितसिंह घाटगे
राजकारणात गेंड्याची कातडी असावी लागते
शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, "राजकारणात यायचे नियोजन नव्हते. राजेंचे निधन झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार दिला पाहिजे, ही भूमिका राहिली. संस्थेत व्यवस्थापन चांगले हवे. सहकार क्षेत्रात काम करताना लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. राजकारणात गेंड्याची कातडी असावी लागते. चांगले काम करताना अडवणारे अनेकजण असतात. खचून जायचे नाही. राजकीय नेत्यांनी किती गंगाराम कांबळे निर्माण केले? प्रोफेशन व जॉब स्वत:चा व्यवसाय सुरू करा."
--------
- मेक इन कोल्हापूर संकल्पना राबवत आहोत
- ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी होणार
- बायोसीएनजीत सर्व ट्रॅक्टर्सचे रुपांतर
- कागल विकासाचे व्यासपीठ होईल
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09824 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..